Home देश राम रहीमच्या डे-यात ६०० मानवी सांगाडे

राम रहीमच्या डे-यात ६०० मानवी सांगाडे

0

सिरसा येथील डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयाच्या परिसरात जमिनीखाली ६०० सांगाडे असल्याची धक्कादायक माहिती तपासातून समोर आली आहे.

सिरसा- डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीमच्या डे-यातील एकेक रहस्ये आता उलगडत आहेत. सिरसा येथील डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयाच्या परिसरात जमिनीखाली ६०० सांगाडे असल्याची धक्कादायक माहिती तपासातून समोर आली आहे. मुख्यालयातील दोन प्रमुख पदाधिका-यांनी विशेष तपास पथकाला ही माहिती दिली.

हरयाणातील सिरसामध्ये राम रहीमच्या डेरा सच्चा सौदाचे मुख्यालय आहे. मुख्यालयाच्या परिसरात ६०० सांगाडे असल्याची माहिती पोलिसांना चौकशीतून मिळाली आहे. डेरा सच्चा सौदाची अध्यक्ष विपश्यना इन्सा आणि उपाध्यक्ष डॉ. पी. आर. नैन या दोघांनी हरयाणा पोलिसांच्या विशेष तपास पथकाला ही माहिती दिली.

मृत्यूनंतर डेरा परिसरात अस्थी पुरल्यास मोक्ष मिळतो, अशी राम रहीमच्या अनुयायांची श्रद्धा आहे. त्यामुळे डेरा परिसरातील जमिनीखाली ६०० लोकांचे सांगाडे आणि अस्थी आहेत, असे नैन याने पोलिसांना सांगितले. मात्र राम रहीमच्या अनुयायांची खरीच अशी काही श्रद्धा होती की, यामधील काहींचे खून करून त्यांचे मृतदेह पुरण्यात आले, याची चौकशी पोलीस करत आहेत.

राम रहीमच्या विरोधात आवाज उठवणा-या लोकांची हत्या करून त्यांचे मृतदेह पुरले जायचे, असे आरोप डे-याच्या माजी अनुयायांनी केले आहेत. मृतदेह पुरल्यानंतर त्याजागी झाड लावले जायचे. त्याबद्दल कुणाला समजू नये याची पुरेपूर काळजी घेतली जात होती. हे रहस्य कधीही जगासमोर येऊ नये यासाठी या भागात खोदकाम न करण्याचे आणि झाड न कापण्याचे आदेश देण्यात आले होते, असे आरोप राम रहिमच्या काही माजी अनुयायांनी या आधी केले आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version