Home टॉप स्टोरी मुंबईत पुन्हा बॉम्बस्फोट पुनरावृत्तीचा दाऊदचा कट

मुंबईत पुन्हा बॉम्बस्फोट पुनरावृत्तीचा दाऊदचा कट

0

१९९३ मुंबई बॉम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार, कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम २४ वर्षांनंतर तशाच प्रकारच्या घातपाताचा कट रचत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मुंबई- १९९३ मुंबई बॉम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार, कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम २४ वर्षांनंतर तशाच प्रकारच्या घातपाताचा कट रचत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

दाऊदचा पाकिस्तानात असलेला भाऊ आणि भारतातील त्याच्या हस्तकांमध्ये सांकेतिक भाषेत झालेले संभाषण मुंबई पोलिसांनी उलगडले असून त्यातून या कटाची माहिती मिळाली आहे. दाऊदच्या या कटाची माहिती केंद्र सरकारलाही देण्यात आली आहे. ‘टाइम्स नाउ’ने हा धक्कादायक खुलासा केला आहे.

मुंबई पोलिसांना दाऊदच्या हस्तकांच्या संभाषणातून इतरही बरीच माहिती मिळाली आहे. दाऊदचे भारतातील काही हस्तक त्याचे बॉम्बस्फोटाचे कट कारस्थान तडीस नेण्यासाठी सक्रिय झाले आहेत. ही माहिती मिळताच पोलिसांनी दाऊदच्या हस्तकांचा शोध सुरू केला आहे.

दाऊदने १९९३ साली मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडवले होते. या स्फोटांमध्ये २५७ जण ठार तर ७००हून अधिक लोक जखमी झाले होते. भारतात झालेले हे सर्वात शक्तीशाली बॉम्बस्फोट होते. त्यासाठी आरडीएक्सचा वापर करण्यात आला होता. त्यावेळीही दाऊदने भारतातील अनेक लोकांची मदत घेतली होती.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version