Home महामुंबई दाऊदची सूत्रे हलविणा-या एका महिलेसह लंगडा पोलिसांच्या जाळ्यात

दाऊदची सूत्रे हलविणा-या एका महिलेसह लंगडा पोलिसांच्या जाळ्यात

0

अंडरवल्र्ड डॉन दाऊद इब्राहिमचा जवळचा साथीदार फारुक याचा भाऊ अहमद मन्सूर उर्फ लंगडा (६५) याला मुंबईतून अटक करण्यात आली आहे.

मुंबई- अंडरवल्र्ड डॉन दाऊद इब्राहिमचा जवळचा साथीदार फारुक याचा भाऊ अहमद मन्सूर उर्फ लंगडा (६५) याला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. त्याच्यासह सना नावाच्या महिलेलाही एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पथकाने अटक केली आहे. जे.जे. मार्ग येथील टिमकर मोहल्ला परिसरात अहमद लंगडा (६५) हा कुटुंबीयांसोबत राहतो. अहमद अंकल म्हणून तो प्रसिद्ध आहे. सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास त्याला राहत्या घरातून ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाचे प्रदीप शर्मा यांच्या पथकाने बेडय़ा ठोकल्या. इक्बाल कासकरच्या चौकशीतून अहमदचे नाव समोर आल्यानंतर ही कारवाई केल्याचे समजते. अहमद याचा भाऊ कराचीमध्ये दाऊदसोबत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

२०१३ मध्ये छोटा शकीलच्या नावाने काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दिकी यांना धमकाविल्याप्रकरणी अहमद मन्सूर उर्फ लंगडा याला मुंबईच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली होती. विशेष म्हणजे दाऊद टोळीतील अहमद लंगडा याला पोलीस वर्तुळात खब-या म्हणून संबोधले जाते. १९९३ साली झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी त्याला अटक करण्यात आली, पण त्याला निर्दोष ठरवण्यात आले होते. चांद मदार हत्येप्रकरणीही तो साक्षीदार आहे. तसेच त्याने डिझेल माफिया मोहम्मद अली याच्याविरोधात साक्ष दिली होती. हाच मुंबईतून डी गँगची सूत्रे हलवित असल्याची माहिती समोर येत आहे.

[EPSB]

ट्विटरची शब्द मर्यादा वाढली

ट्विटरचा नवा ट्विट- ट्विटरवर १४० शब्दांवरून आता २२०-२२५ शब्द वापरता येणार.

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version