Home टॉप स्टोरी खडसेंवर दाऊदसंबंधाचे आरोप करणारा भंगाळे अटकेत

खडसेंवर दाऊदसंबंधाचे आरोप करणारा भंगाळे अटकेत

0

माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे दाऊदशी संबंध असल्याचा खळबळजनक आरोप करणा-या हॅकर मनिष भंगाळेला मुंबईच्या गुन्हे शाखा विभागाने अटक केली आहे.

मुंबई- माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे दाऊदशी संबंध असल्याचा खळबळजनक आरोप करणा-या हॅकर मनिष भंगाळेला मुंबईच्या गुन्हे शाखा विभागाने अटक केली आहे.

मनिष भंगाळे या इथिकल हॅकरने दाऊदचे कॉल ट्रेस केल्याचा दावा केला होता. त्याने २०१४ ते २०१५ दरम्यान दाऊदने कोणाला फोन केले होते, याची माहिती जाहीर केली होती.

दाऊदच्या कॉल लिस्टमध्ये १० भारतीय नंबर होते, त्यापैंकी एक नंबर एकनाथ खडसेंचा असल्याचा दावा मनिषने केला होता. अन्य क्रमांकाची माहिती काढण्याची मागणीही त्याने यावेळी पोलिसांकडे केली होती.

मनिषने केलेल्या आरोपांची चौकशी पोलीस करत होते. मात्र या चौकशी दरम्यान त्यांनी मनिषलाच अटक केली आहे. पण मनिषला नेमक्या कोणत्या कारणामुळे अटक झाली, याचा खुलासा पोलिसांनी केलेला नाही.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version