Home महाराष्ट्र डी. एन. अटकोरे उत्तम प्रशासक-लाड

डी. एन. अटकोरे उत्तम प्रशासक-लाड

0

कर्जत नगरपालिकेच्या इतिहासात कर्जत नगरपालिकेत निवृत होणारे आणि आपली दोन टर्मची कारकीर्द यशस्वीपणे पार पाडणारे मुख्याधिकारी डी. एन. अटकोरे हे उत्तम प्रशासक असल्याचे गौरवोद्गार कर्जतचे आ. सुरेश लाड यांनी काढले.


नेरळ- कर्जत नगरपालिकेच्या इतिहासात कर्जत नगरपालिकेत निवृत होणारे आणि आपली दोन टर्मची कारकीर्द यशस्वीपणे पार पाडणारे मुख्याधिकारी डी. एन. अटकोरे हे उत्तम प्रशासक असल्याचे गौरवोद्गार कर्जतचे आ. सुरेश लाड यांनी काढले. कर्जत पालिकेचे मुख्याधिकारी अटकोरे यांच्या सेवानिवृती सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

अटकोरे आपल्या ३५ वर्षाच्या शासकीय सेवेतून निवृत झाले. त्याबद्दल त्यांचा निरोप संभारभाचा कार्यक्रम कर्जत नगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने आयोजित केला होता. त्यावेळी कर्जत आमदार सुरेश लाड, नगराध्यक्ष अध्यक्षा रजनी गायकवाड, उपनगराध्यक्षा अर्चना बैलमारे, माजी नगराध्यक्ष राजेश लाड उपस्थित होते. यावेळी कर्जत शहरातील विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष यांनी अटकोरे यांचा सत्कार केला. आ. लाड यांनी अटकोरे यांनी दोन वेळा पालिकेचे मुख्याधिकारी म्हणून काम पाहिले.

दोन्ही वेळेस आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम करीत असताना अटकोरे यांनी मुख्याधिकारी म्हणून कर्जत प्रश्न सोडविण्यासाठी सतत पुढाकार घेतला. शहरात आज जे पक्के रस्ते, पिण्याच्या पाण्याची योजना, गटार आणि स्वच्छतेची जी काही कामे झाले आहेत त्यामध्ये अटकोरे यांचा निश्चितच मोठा वाटा आहे.

माजी नगराध्यक्ष राजेश लाड यांनी आमदार आणि मुख्याधिकारी यांनी पुढाकार घेतल्याने शहराला दरवर्षी भेडसावणारा महापुराच्या धोका टाळण्यासाठी त्यांचे योगदान मोठे राहिले. त्याचवेळी उल्हासनदी स्वच्छ देखील होण्यात मदत झाली असल्याचे मत मांडले. कर्जत नगरपालिकेच्या अध्यक्षा रजनी गायकवाड, सभापती उमेश गायकवाड, पालिका कर्मचारी रवी लाड, भाजपाचे सुनील गोगटे, माजी नगरसेवक नितीन परमार आदींनी अटकोरे याच्या कार्याचा गौरव केला.

[EPSB]

इस्लामाबाद – पाकिस्तान लष्कर प्रमुख कमर जावेद बाजवा, यांनी काश्मीर मुद्दय़ावर राजकीय आणि राजनैतिक स्तरावर तोडगा काढला पाहिजे,

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version