Home देश ‘कॉँग्रेसने क्षमता पाहून नेता निवडावा’

‘कॉँग्रेसने क्षमता पाहून नेता निवडावा’

0

अमेरिका दौ-यावर जाण्याआधी अर्थमंत्री अरुण जेटलींनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. ‘काँग्रेसने क्षमतेच्या आधारे नेते निवडावेत,’ अशा शब्दांमध्ये जेटलींनी राहुल गांधींवर शरसंधान साधले.

नवी दिल्ली- अमेरिका दौ-यावर जाण्याआधी अर्थमंत्री अरुण जेटलींनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. ‘काँग्रेसने क्षमतेच्या आधारे नेते निवडावेत,’ अशा शब्दांमध्ये जेटलींनी राहुल गांधींवर शरसंधान साधले. गेल्या महिन्यात अमेरिकेतील बर्कले विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राहुल गांधींनी भारतातील सर्वच क्षेत्रांमध्ये घराणेशाही असल्याचे म्हटले होते. राहुल गांधींच्या याच विधानावरून जेटलींनी त्यांच्यावर टीका केली आहे. लवकरच राहुल गांधींची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड होणार असल्याचीही चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर जेटलींनी राहुल यांना लक्ष्य केले.

अर्थमंत्री अरुण जेटली व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बर्कले इंडिया परिषदेत सहभागी झाले होते. राहुल गांधींनी गेल्या महिन्यात बर्कले विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता. त्यावेळी राहुल गांधींना राजकारणातील घराणेशाहीबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी ‘राजकारणातील घराणेशाही एक समस्या आहे. मात्र काँग्रेस पक्षातील बहुतांश नेते घराणेशाहीतून पुढे आलेले नाहीत,’ असे राहुल गांधींनी म्हटले होते. मात्र भारतातील बहुतांश क्षेत्रात घराणेशाही असल्याचे त्यांनी मान्य केले होते. याबद्दल बोलताना त्यांनी अखिलेश यादव, अभिषेक बच्चन यांची नावे घेतली होती. बर्कले विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राहुल गांधी यांनी ध्रुवीकरणाच्या राजकारणावरून मोदी सरकारला लक्ष्य केले होते.

अरुण जेटली आठवडय़ाभराच्या अमेरिका दौ-यावर जाणार आहेत. या दौ-यावर जाण्याआधी त्यांनी काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली. ‘अनेक दशके सत्तेत राहिलेला काँग्रेस पक्ष सध्या लोकांपासून दूर आहे. लोकांच्या महत्त्वाकांक्षा जाणून घेण्यात काँग्रेसला अपयश आले आहे. काँग्रेसला पक्षांतर्गत आव्हानांचाही सामना करावा लागत आहे. त्यामुळेच काँग्रेससमोरील आव्हान दुहेरी स्वरूपाचे आहे,’ असे अरुण जेटलींनी म्हटले. अरुण जेटली त्यांच्या आठवडय़ाभराच्या अमेरिका दौ-यांत उद्योगपतींची भेट घेणार आहेत. या दौ-यादरम्यान जेटली न्यूयॉर्क आणि बोस्टनलाही भेट देणार आहेत. यानंतर ते आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेच्या वार्षिक सभेसाठी वॉशिंग्टनला जाणार आहेत.

[EPSB]

भविष्यातील धोक्याची सूचना

श्चिम रेल्वे मार्गावरील एलफिन्स्टन रोड स्थानकात शुक्रवार दि. २९ सप्टेंबर २०१७ रोजी झालेल्या चेंगराचेंगरीत २३ प्रवासी मृत्युमुखी पडल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी ७ ऑक्टोबर रोजी नायगाव स्थानकात प्रवाशांनी केलेल्या आंदोलनाच्या चेंगराचेंगरीत एक तरुणी बेशुद्ध पडली आणि तिला रुग्णालयात दाखल करावे लागले.

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version