Home महामुंबई जीर्ण इमारतींच्या पाहणीसाठी रहिवाशांचा म्हाडा अधिका-यांना घेराव

जीर्ण इमारतींच्या पाहणीसाठी रहिवाशांचा म्हाडा अधिका-यांना घेराव

0

हुसैनी इमारत दुर्घटनेनंतर आजूबाजूच्या परिसरात जुन्या इमारतीत राहणारे रहिवाशी भयभीत झाले असून घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी आलेल्या म्हाडाच्या अभियत्यांना येथील महिला रहिवाशांनी घेराव घातला.

मुंबई- हुसैनी इमारत दुर्घटनेनंतर आजूबाजूच्या परिसरात जुन्या इमारतीत राहणारे रहिवाशी भयभीत झाले असून घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी आलेल्या म्हाडाच्या अभियत्यांना येथील महिला रहिवाशांनी घेराव घातला. हवालदिल झालेल्या महिलांनी आमच्याही इमारतीची ‘हुसैनी’ होऊ देणार का? असा सवाल करत आताच्या आता आमच्या इमारतींची पाहणी करण्याची मागणी म्हाडा अधिका-यांकडे केली.

हुसैनी इमारतीच्या समोरील बाजूस रसूल व मरियम मंजिल या जीर्ण इमारती आहेत. या इमारतींची दुरुस्ती झाल्यावरही भितींना वारंवार तडे जात असल्याची रहिवाशांची तक्रार आहे. पाहणीसाठी पोहोचलेल्या म्हाडा अधिका-यांपुढे त्यांनी हा तक्रारीचा पाढा वाचत दुरुस्तीची मागणी केली. निकृष्ट दर्जाच्या दुरुस्तीमुळे बांधकाम ढासळत आहे, अशी त्यांची तक्रार होती. अखेरीस अधिका-यांनी महिलांसमवेत इमारतींची पाहणी केली. रसूल व मरियम या दोन्हीं इमारती १०० वर्षांहून अधिक जुन्या आहेत. ‘हुसैनी’ कोसळल्यानंतर आपल्या इमारतीचे काय होईल, या भीतीपोटी रात्रभर झोप लागली नसल्याचे रसूल इमारतीमधील स्त्रियांनी सांगितले. तीनमजली रसूल इमारतीमध्ये ६५ कुटुंबे आहेत. काहींची चौथी पिढी या ठिकाणी वास्तव्याला आहे. तळमजल्यावरील दुकाने लाकडी टेकूवर टिकून आहेत. तर पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या सुरय्या शेख यांच्या घरातील जमीन खचली आहे.

हुसैनीशेजारच्या पाच इमारती केल्या रिक्त

भेंडीबाजार येथील हुसैनी ही पाच मजली इमारती गुरुवारी सकाळी पत्त्याच्या घराप्रमाणे कोसळून ३३ जणांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारला जाग आली आहे. आता अन्य धोकादायक इमारतींवर प्रशासनाची नजर पडली असून हुसैनी इमारतीच्या शेजारील आरसीवाला, डांबरवाला, ओनवाला, काचवाला यासह एकूण पाच इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत. या इमारतींचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला असून इमारतीच्या प्रवेशद्वारांवर पोलीस तैनात करण्यात आले आहे.

११७ वर्षे जुनी हुसैनी इमारत डोळे उघडलेल्या प्रशासनाने तातडीने धोकादायक इमारत रिक्त करण्यास सुरुवात केली आहे. हुसैनी इमारतीला पालिकेने २०११ मध्येच धोकादायक ठरवले होते. मात्र, आरटीआयद्वारे मागवण्यात आलेल्या माहितीत २०१५ मध्ये धोकादायक इमारतीत हुसैनी इमारतीचे नाव नसल्याची माहिती पुढे आल्याचे जय हो फाऊंडेशनचे अध्यक्ष अफरोज मलिक यांनी सांगितले. म्हाडानेही ही इमारत रिकामी करण्याबाबतचा पत्रव्यवहार केला होता. या पार्श्वभूमीवर वेळीच इमारतीतील विद्युत पुरवठा आणि पाणी पुरवठा खंडित करणे गरजेचे असताना, तसे करण्यात आले नाही.

[EPSB]

मुसळधार पावसाने अनेक मुंबईकरांनी आपले प्राण गमावल्यानंतर आता मुंबई हायकोर्टाने शनिवारी राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढले.

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version