Home महामुंबई छोटा शकीलला रसद पुरवणारा गंगर अटकेत

छोटा शकीलला रसद पुरवणारा गंगर अटकेत

0

खंडणी रॅकेटमधील मुख्य सूत्रधार शकील शेख ऊर्फ छोटा शकील ऊर्फ सी. एस. याला प्रत्येक महिन्याला हवालामार्फत १० ते १५ लाख रुपयांची आर्थिक रसद पुरवणारा मटका व्यावसायिक पंकज जगसी गंगर (५४) याला ठाणे खंडणी विरोधी पथकाने बोरिवलीतून राहत्या घरातून अटक केली.

ठाणे- खंडणी रॅकेटमधील मुख्य सूत्रधार शकील शेख ऊर्फ छोटा शकील ऊर्फ सी. एस. याला प्रत्येक महिन्याला हवालामार्फत १० ते १५ लाख रुपयांची आर्थिक रसद पुरवणारा मटका व्यावसायिक पंकज जगसी गंगर (५४) याला ठाणे खंडणी विरोधी पथकाने बोरिवलीतून राहत्या घरातून अटक केली. त्याच्या अटकेनंतर अटक आरोपींची संख्या चार झाली आहे.

एकेकाळी कुख्यात गुंड अरुण गवळी गँगशी संलग्न असलेला गंगर याला वसंत शहा आणि शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येच्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी अटक केली होती. त्याला मोक्काही लावला होता, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप शर्मा यांनी दिली.
अंडरवल्र्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर आणि त्याच्या दोन हस्तकांना १८ सप्टेंबर रोजी ठाणे खंडणी विरोधी पथकाने अटक केल्यानंतर खंडणी रॅकेटची पाळेमुळे शोधताना पोलिसांच्या रडारवर पंकज गंगर याच्यासह अन्य काही आले आहेत. फरार गंगरबाबत माहिती मिळाल्यानंतर बुधवारी रात्रीच त्याला तो राहत असलेल्या बोरिवली पश्चिमेकडे असणा-या सोडावाला लेनवरील चामुंडा सर्कल येथील एका सोसायटीत ठाणे खंडणी विरोधी पथकाने ताब्यात घेतले.

गुरुवारी ठाणे न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याला ५ ऑक्टोबरपयर्ंत पोलिस कोठडी सुनावली आहे. गुंड अरुण गवळी टोळीशी अगोदर संलग्न असलेला गंगर गवळीलाही पैशाचा पुरवठा करत असल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र गंगर याची मटका व्यावसायिक म्हणून ओळख आहे. पूर्वी तो मटका चालवत होता. परंतु आता कन्स्ट्रक्शन व्यवसायात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

मुंबईतील दोन खुनाच्या गुन्ह्यांत गंगरला अटक झाली होती. १९९८ मध्ये वसंत शहा याची मुंबईत हत्या झाली होती. तर २००८ मध्ये शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांची घाटकोपरमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी गंगर याला अटक करण्यात आली होती. तसेच त्याला मोक्का देखील लागला होता, अशी माहिती खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप शर्मा यांनी दिली. जामसंडेकर हत्याकांडात सध्या अरुण गवळी जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.

[EPSB]

ऑगस्ट महिन्यात तुफानी पावसाने मुंबई आणि ठाणे परिसराला पुन्हा एकदा दणका दिला. प्लास्टिक पिशव्या-थमार्कोलचा भस्मासूर, नालेसफाईचा बोजवारा, पर्जन्यपाणी वाहून नेण्याची क्षीण झालेली यंत्रणा या नेहमीच्या बाबी मुंबई तुंबण्यास कारणीभूत असतानाच, या पावसात उघडय़ा मॅनहोलचा मुद्दा पुढे आला.

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version