Home क्रीडा कुश, हर्षिताने जिंकली आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धा

कुश, हर्षिताने जिंकली आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धा

0

मुंबई जिल्हा बुद्धिबळ असोसिएशन आयोजित भारतरत्न राजीव गांधी धारावी क्रीडा संकुलात झालेल्या आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेत १० वर्षाखालील मुले आणि मुली गटात अनुक्रमे अमेरिकन स्कूल ऑफ बाँबेच्या (वांद्रे-कुर्ला संकुल) कुश भगत आणि कॅथ्रेडल अँड जॉन कॅनन स्कूलच्या (फोर्ट) हर्षिता महेश्वरीने बाजी मारली.

मुंबई- मुंबई जिल्हा बुद्धिबळ असोसिएशन आयोजित भारतरत्न राजीव गांधी धारावी क्रीडा संकुलात झालेल्या आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेत
१० वर्षाखालील मुले आणि मुली गटात अनुक्रमे अमेरिकन स्कूल ऑफ बाँबेच्या (वांद्रे-कुर्ला संकुल) कुश भगत आणि कॅथ्रेडल अँड जॉन कॅनन स्कूलच्या (फोर्ट) हर्षिता महेश्वरीने बाजी मारली.

कँडिडेट मास्टर कुश आणि हर्षिताने नऊ फे-यांमध्ये अनुक्रमे साडेआठ आणि आठ गुण मिळवत अव्वल स्थानासह ट्रॉफी पटकावली. सात वर्षीय कुशच्या खात्यात फिडे रेटिंग १५२१ यलो गुण असून त्याने वेस्टर्न युथ बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले आहे. शिवाय जागतिक शालेय ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत ७ वर्षाखालील गटात विजेता ठरला आहे. कुशसह हर्षिता हे दक्षिण मुंबई बुद्धिबळ अ‍ॅकॅडमीचे बुद्धिबळपटू आहेत. १२ वर्षाखालील गटात मुलांमध्ये राहिल मुळीक (९ गुण) आणि मुलींमध्ये क्रिती पटेल (९ गुण), १४ वर्षाखालील गटात ओक खारोला (८.५ गुण) आणि अनन्या गुप्ता (६.५ गुण) तसेच १६ वर्षाखालील गटात रिषभ शाह (८.५ गुण) आणि तुती पटेलने (६.५ गुण) बाजी मारली.

[EPSB]

र्वरित मालिकेसाठीही धवनला रजा मंजूर

भारताचा डावखुरा सलामीवीर शिखर धवनला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांसाठी रजा मंजूर करण्यात आली आहे.

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version