Home महामुंबई पश्चिम रेल्वेवर २८०० कॅमेरे

पश्चिम रेल्वेवर २८०० कॅमेरे

0

वाढलेली प्रवाशांची संख्या आणि पोलिसांवरील ताण पाहता गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पश्चिम रेल्वेवरील स्थानकांत एकूण २,८०० सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

मुंबई- वाढलेली प्रवाशांची संख्या आणि पोलिसांवरील ताण पाहता गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पश्चिम रेल्वेवरील स्थानकांत एकूण २,८०० सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण अनेक कारणास्तव या प्रस्तावाची फाइल गेल्या काही महिन्यांपासून पुढे सरकत नव्हती. अखेर रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी यावर तात्काळ निर्णय घेऊन हा प्रस्ताव मार्गी लावा, असे आदेश रेल्वे बोर्ड अधिकारी व पश्चिम रेल्वे प्रशासनाला दिले. त्यानुसार आता प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

२६/११ मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात सीएसएमटी स्थानकात दोन दहशतवाद्यांकडून शस्त्रास्त्रांसह हल्ला करण्यात आला. यात अनेक प्रवाशांना प्राण गमवावे लागले. त्यापूवीर्ही मुंबई उपनगरीय रेल्वेला दहशतवाद्यांकडून टार्गेट करण्यात आले होते. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून सुरक्षाविषयक अनेक बदल केले जात असून यात एकात्मिक सुरक्षेअंतर्गत आधुनिक प्रकारचे सीसीटीव्ही बसविले जात आहेत. पश्चिम रेल्वेवरील लोकलचा पसारा हा चर्चगेट ते डहाणूपयर्ंत आहे. सध्या या अतिरिक्त रकमेचे कंत्राट कंपनीला कसे देण्यात आले याचा खुलासा करावा. त्याचबरोबर याप्रकरणी संबंधितांवर जबाबदारी निश्चित करावी.

बेस्टचा आर्थिक डोलारा सावरण्यासाठी पालिकेने काही उपाययोजना सुचविल्या होत्या. त्याचे काय झाले याचा अहवालही सादर करण्याची सूचना आयुक्तांनी केली आहे. आर्थिक क्षमता नसताना आणि पालिकेकडून १०० कोटी मंजूर झालेले असताना टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीबरोबर अतिरिक्त रकमेचा करार करून बसगाडय़ा खरेदीचा घाट घालणारा बेस्ट उपक्रम आधीच अडचणीत आला आहे. आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिल्यामुळे बेस्टच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. चर्चगेट ते विरापयर्ंतच्या सर्व स्थानकांवर सीसीटीव्ही आहेत, परंतु विरारपुढील वैतरणा, सफाळे, केळवे रोड, पालघर, बोईसर, वाणगाव, डहाणू रोड स्थानकात सीसीटीव्ही नाहीत. त्यामुळे एखाद्या गुन्ह्याचा तपास करताना रेल्वे सुरक्षा दलाला मोठी कसरत करावी लागते. हे पाहता विरारपुढील सात स्थानकांवर सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत. २,८०० सीसीटीव्हींमधूनच या स्थानकांत सीसीटीव्ही बसवण्यात येतील.

[EPSB]

नाशिकमधील तिबेटीयन मार्केटमध्ये स्फोट

नाशिकच्या शरणपूर रोड परिसरातील तिबेटीयन मार्केटमध्ये पहाटेच्या सुमारास स्फोट झाला. या स्फोटात मार्केटमधील पाच गाळ्यांचे नुकसान झाले.

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version