Home टॉप स्टोरी पणजी पोटनिवडणुकीत मनोहर पर्रीकर विजयी

पणजी पोटनिवडणुकीत मनोहर पर्रीकर विजयी

0

गोव्यातल्या पणजी विधानसभेच्या जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा विजय झाला तर आरोग्यमंत्री विश्वजित राणे वाळपई मतदारसंघातून विजयी झाले आहे.

पणजी- गोव्यातल्या पणजी विधानसभेच्या जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा विजय झाला तर आरोग्यमंत्री विश्वजित राणे वाळपई मतदारसंघातून विजयी झाले आहे. या निवडणुकीसह दिल्ली, आंध्र प्रदेशातल्या एकूण ४ विधानसभा जागांसाठी २३ ऑगस्टला पोटनिवडणूक झाली होती. त्याची मजमोजणी सुरू आहे.

मनोहर पर्रीकर यांनी चार हजार ८०३ मतांनी निवडणूक जिंकली. पणजीत काँग्रेसला पाच हजार ६० मते मिळाली. वाळपई विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे विश्वजीत राणे १० हजार ०६६ मतांनी विजयी झाले आहेत. राणेंनी फेब्रुवारी २०१७ मध्ये काँग्रेस पक्षातून निवडणूक जिंकली होती, त्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला.

दिल्लीतल्या बवाना विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीच्या पाचव्या फेरीपर्यंत काँग्रेस ११,०९७ मते घेत आघाडीवर होती, तर भाजप उमेदवार दुस-या स्थानावर होता.

मतमोजणी पणजीत गोमेकॉच्या जुन्या इमारतीत झाली. तेथे स्ट्राँग रुम तयार करण्यात आली असून बुधवारी मतदान संपल्यानंतर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रं या ठिकाणी आणली गेली. तेथे कडक पोलिस पहारा होता. सोमवारी सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरु झाली होती.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version