Home महामुंबई तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत माथेरानच्या विद्यार्थ्यांचे यश

तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत माथेरानच्या विद्यार्थ्यांचे यश

0

कर्जत येथे खेळविलेल्या तालुकास्तरीय आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेत माथेरानमधील शालेय विध्यार्थ्यांनी अनपेक्षित असे घवघवीत यश मिळविले.

माथेरान- कर्जत येथे खेळविलेल्या तालुकास्तरीय आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेत माथेरानमधील शालेय विध्यार्थ्यांनी अनपेक्षित असे घवघवीत यश मिळविले. क्रीडा क्षेत्रात आपला ठसा उमटविताना २ सुवर्ण, २ रौप्य तसेच ४ कांस्य पदक मिळविले आहे, त्यामळे सर्व स्तरातून या विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद यांनी आयोजित केलेल्या तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा २०१७-२०१८ चे आयोजन केले होते. त्यात माथेरान येथील प्राचार्य शांताराम यशवंत गव्हाणकर विद्यामंदिर व नगरपरिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेत १४, १७ आणि १९ वर्षाखालील वयोगटात घवघवीत यश प्राप्त करून क्रीडा क्षेत्रात आपल्या बुद्धिचातुर्याचा ठसा उमटवला आहे.

सोमवार ४ सप्टेंबर रोजी कर्जत येथील अभिनव ज्ञानमंदिर येथे संपन्न झालेल्या तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत प्राचार्य शांताराम यशवंत गव्हाणकर शाळेचे २५ विद्यार्थी व नगरपरिषद शाळेच्या १० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये १७ वर्षाखालील मुलांच्या गटात विध्यार्थ्यांनी विशेष कामगिरी बजावत तालुक्याच्या संघात ५ पैकी ५ जागा जिंकल्या तसेच मुलींमध्ये स्वरूपा संतोष खाडे ही ५ पैकी ५ सामने जिंकून अजिंक्य राहिली. १४ व १५ सप्टेंबर रोजी होणा-या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी माथेरानच्या १५ विद्यार्थ्यांची कर्जत संघात निवड झाली आहे. असे शाळेचे क्रीडा शिक्षक दिनकर चव्हाण यांनी सांगितले.

[EPSB]

सर्वोच्च न्यायालयाकडून ‘तिला’ गर्भपाताची परवानगी

सर्वोच्च न्यायालयाने ३१ आठवड्यांच्या गर्भवती असलेल्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला गर्भपातासाठी परवानगी दिली आहे.

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version