Home टॉप स्टोरी दाऊद इब्राहिमची ब्रिटनमधील संपत्ती जप्त

दाऊद इब्राहिमची ब्रिटनमधील संपत्ती जप्त

0

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची ब्रिटनमधील ४२ हजार कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.

नवी दिल्ली- भारताचा मोस्ट वाँटेड दहशतवादी, १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार, कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची ब्रिटनमधील अब्जावधींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. दाऊदची ६.७ बिलियन डॉलर म्हणजेच जवळपास ४२ हजार कोटींची संपत्ती जप्त केली आहे.

दाऊद सध्या पाकिस्तानमध्ये वास्तव्यास असून या कारवाईने दाऊदच्या आर्थिक नाड्या आवळल्या गेल्या आहेत. यापूर्वी मोदी सरकारच्या सांगण्यावरून यूएईनेही दाऊदची १५ हजार कोटींची संपत्ती जप्त केली होती.

ऑगस्ट महिन्यात ब्रिटन सरकारच्या ट्रेजररी विभागाने एक यादी तयार केली होती. २०१५ मध्ये ब्रिटनला भारताने ही फाइल दिली होती. त्या आधारे तपास करून ब्रिटिश सरकारने दाऊदच्या संपत्तीवर टाच आणली आहे. या यादीत दाऊदच्या तीन ठिकाणांचा आणि २१ उपनावांचा उल्लेख होता.

दाऊदने २१ वेळा नाव बदलून संपत्ती खरेदी केली होती. या यादीनुसार दाऊदचे पाकिस्तानमध्ये तीन ठिकाणे आहेत. लंडनमध्ये दाऊदने जे कोट्यवधीचे हॉटेल, मॉल आणि बंगले खरेदी केले होते त्या सर्वांवर आता त्याला पाणी सोडावे लागणार आहे.

दाऊद इब्राहिम पाकिस्तानमध्ये लपून बसला असला तरी त्याने जगभरातील आठ देशांमध्ये आपल्या संपत्तीचे जाळे पसरले आहे. परंतु मोदी सरकाच्या चक्रव्यूहामुळे आता दाऊदच्या एक-एक करून संपत्ती कमी होत चालल्या आहेत.

[EPSB]

दाऊदच्या पाकिस्तानमधील तीन मालमत्ता जप्त

भारताचा मोस्ट वॉंटेड डॉन दाऊद इब्राहिमच्या मालमत्तांना ब्रिटिश सरकारने आर्थिक निबंर्धांच्या यादीमध्ये समाविष्ट केले आहे.

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version