Home महामुंबई बोरगाव येथील बैल चोरीप्रकरणी अटक

बोरगाव येथील बैल चोरीप्रकरणी अटक

0

बोरगाव येथील बाळू पाटील यांच्या मालकीचे दोन बैल चोरीस गेल्याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. या संदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

कर्जत- बोरगाव येथील बाळू पाटील यांच्या मालकीचे दोन बैल चोरीस गेल्याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. या संदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नेरळ पोलिसांनी याचा योग्य तपास करत एकाच अटक केली आहे. तर बैल विकत घेणारे दोन इसम आणि गुन्ह्यात वापरण्यात येणा-या टेम्पोचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

२६ सप्टेंबर रोजी बोरगाव येथील बाळू अमृता पाटील यांचे दोन बैल चोरीला गेले होते. या संदर्भात त्यांनी नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर नेरळ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी गुन्ह्यांतील फिर्यादी व इतर साक्षीदारांची विचारपूस करून गोपनीय माहिती काढून चोरीस गेलेले बैल हे बाटल्याचीवाडी, पाटगाव येथे राहणारा लक्ष्मण दत्तू निरगुडा यांनी चोरल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी तत्काळ त्याला अटक केली आहे.

या आरोपीकडे नेरळ पोलिसांनी अधिक तपास केला असता गुन्हय़ात चोरलेले दोन बैल दामत येथे राहणारे २ इसमांनी विकत घेऊन टेम्पोमध्ये भरून नेल्याची माहिती मिळाली. परंतु, गुन्हय़ातील चोरलेले विकत घेणारे दोन इसम तसेच गुन्ह्यात वापर झालेला विक्रम टेम्पो मिळून आला नसून त्याचा शोध सुरू आहे. या आरोपीकडून चोरलेले बैल पोलिसांनी जप्त केले असून यासंदर्भात नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

[EPSB]

नाशिकमधील तिबेटीयन मार्केटमध्ये स्फोट

नाशिकच्या शरणपूर रोड परिसरातील तिबेटीयन मार्केटमध्ये पहाटेच्या सुमारास स्फोट झाला. या स्फोटात मार्केटमधील पाच गाळ्यांचे नुकसान झाले.

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version