Home महामुंबई महापालिका निवडणुकीतील विकासाचे मुद्दे गायब

महापालिका निवडणुकीतील विकासाचे मुद्दे गायब

0

मुंबई महापालिकेत आतापर्यंत जोडीने मुंबईकरांची फसवणूक करणा-या आणि मुंबईला कंगाल बनवणा-या सेना-भाजपाने मात्र या प्रचारात विकासाच्या मुद्दयांना बगल दिल्याचे दिसत आहे.

मुंबई- मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला विविध राजकीय पक्षांकडून सुरुवात झालेली असतानाच; मुंबई महापालिकेत आतापर्यंत जोडीने मुंबईकरांची फसवणूक करणा-या आणि मुंबईला कंगाल बनवणा-या सेना-भाजपाने मात्र या प्रचारात विकासाच्या मुद्दयांना बगल दिल्याचे दिसत आहे.

केवळ एकमेकांकवर भ्रष्टाचार आणि विविध प्रकारचे आरोप-प्रत्यारोप करत असून मुंबईकरांचा विकास आणि मुंबईतील गंभीर प्रश्नावर सेना-भाजपाचे नेते बोलत नसल्याने त्यांच्याकडून विकासाचे मुद्देच गायब होताना दिसत आहेत.

मुंबई महापालिकेच्या निवडणूक प्रचारात सेना-भाजपाकडून मुलुंड डम्पिंग ग्राऊंड, पारदर्शकता, आकृती बिल्डर, नागपूर महापालिका, राज्य सरकारमधील भष्टाचार, सेना विरुद्ध भाजपा, नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यावरच प्रचाराचे मुद्दे गाजताना दिसून येत आहेत; मात्र प्रचारसभेत विकासाचे मुद्देऐवजी वैयक्तिक टीका सभेत करताना दिसून येत आहे. त्यामुळे विकासाचे मुद्देपासून सेना आणि भाजपा लांब जात असल्याची चर्चा मुंबईकरांत आहे.

महापालिका सेना-भाजपा यांची युती असताना मात्र त्यांना मुंबईच्या विकास करू शकले नाहीत आणि आता मुंबईच्या विकासाच्या मुद्दयांवर चर्चा न करता केवळ भावनिक मुद्दयांना हात घातला जात आहे. दुसरीकडे काँग्रेसने मात्र मुंबईकरांच्या विकासावरच भर दिला आहे.

महापालिकेतील भ्रष्टाचारासोबत मुंबईकरांचे आरोग्य, मूलभूत सोयीसुविधा, रस्ते, गटारे आणि विशेषत: पिण्याच्या पाण्यासाठी काँग्रेसकडून महत्त्वाचा मुद्दा या निवडणुकीच्या प्रचारात समोर आणला गेल्याने सत्ताधारी व एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोप करणा-या सेना-भाजपाची मोठी अडचण होणार आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version