Home महामुंबई ठाणे डोंबिवली पश्चिमेकडील दिवाळी पहाट कार्यक्रमात अंध व्यक्तींचा सत्कार

डोंबिवली पश्चिमेकडील दिवाळी पहाट कार्यक्रमात अंध व्यक्तींचा सत्कार

0

युवक काँग्रेस डोंबिवली विधानसभा सचिव तथा शिक्षण मंडळ समितीचे माजी उपसभापती अमित म्हात्रे यांच्या वतीने डोंबिवली पश्चिमेकडील सम्राट चौक येथे आयोजित केलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अंध व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.

डोंबिवली- युवक काँग्रेस डोंबिवली विधानसभा सचिव तथा शिक्षण मंडळ समितीचे माजी उपसभापती अमित म्हात्रे यांच्या वतीने डोंबिवली पश्चिमेकडील सम्राट चौक येथे आयोजित केलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अंध व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. गेल्या तीन वर्षापासून सुरू असलेल्या या कार्यक्रमाचे नागरिकांनी कौतुक करत यावेळी सेल्फी पॉईंट येथे तरुणवर्गाने गर्दी केली होती.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सदस्या तथा माजी नगरसेविका रत्नप्रभा भास्कर म्हात्रे, काँग्रेस गटनेते नंदू म्हात्रे, माजी नगरसेवक हृदयनाथ भोईर, काँग्रेस पदाधिकारी सत्यवान म्हात्रे, वर्षा शिखरे, वर्षा गुजर, डॉ. अकोले आदी मान्यवर उपस्थित होते. जयहिंद अंध कल्याणकारी संस्थेच्या सदस्य असलेल्या अंध व्यक्तींचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून त्यांना पांढरी काठी देण्यात आली. तर यावेळी काही कर्णबधिर व्यक्तींचाही सत्कार झाला.

ईगल ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ बिवलकर, अशोक हेगिष्टे आदींचाही सत्कार करण्यात आला. यावेळी यावेळी आयोजित केलेला ऑर्केस्ट्रा पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. डोंबिवली पश्चिमेकडे दिवाळी पहाट कार्यक्रम ठेवल्याने नागरिकांनी अमित म्हात्रे यांचे आभार मानले.

[EPSB]

सिंधुदुर्गातील जनतेचे राणेंशी असलेले ‘अतूट नाते’ सिद्ध

ग्रामपंचायत निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षप्रणीत समर्थ विकास पॅनलच्या झालेल्या एकतर्फी विजयामुळे सिंधुदुर्गातील जनता नारायण राणे यांच्याच पाठिशी असल्याचा संदेश महाराष्ट्रात गेला असल्याची प्रतिक्रिया आमदार नितेश राणे यांनी मंगळवारी व्यक्त केली.

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version