Home महामुंबई मीरा भाईंदर शिवसेना नगरसेवक भाजपात

मीरा भाईंदर शिवसेना नगरसेवक भाजपात

0

मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीला अवघे १८ दिवस झाले असताना शिवसेना नगरसेवकांना सत्तेचे डोहाळे लागले असून सत्तेत सहभाग मिळण्यासाठी नगरसेवकाने थेट मुखमंत्र्यांच्या दरबारात जाऊन भाजपात प्रवेश केला.

भाईंदर- मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीला अवघे १८ दिवस झाले असताना शिवसेना नगरसेवकांना सत्तेचे डोहाळे लागले असून सत्तेत सहभाग मिळण्यासाठी नगरसेवकाने थेट मुखमंत्र्यांच्या दरबारात जाऊन भाजपात प्रवेश केला. शिवसेना पक्षश्रेष्ठींनी दम मारताच बालिश खुलासा करून गेलेली प्रतिष्ठा सावरण्याचा प्रयत्न करून स्वत:चे हसे करून घेतले आहे.

मीरा भाईंदर महापालिका निवडणूक २० ऑगस्टला पार पडली आणि २१ ऑगस्टला निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. काल (शनिवारी) संध्याकाळी भाजप पक्षाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री, त्यांच्या मंत्रिमंडळाचे अनेक सदस्य आणि आमदार भाईंदरच्या केशवसृष्टीमध्ये आले होते. भाजपाच्या त्या कार्यक्रमात शिवसेना नगरसेवक राजू भोईर, त्यांचे बंधू तथा शिवसेनेचे पराभूत उमेदवार दिलीप भोईर आपल्या काही समर्थकासह आले.

आ. नरेंद्र मेहता यांच्या माध्यमातून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. चर्चा केली आणि त्यानंतर महापौर, उपमहापौर, भाजपा जिल्हाध्यक्षांच्या साक्षीने भाजप मफलर गळ्यात घालून प्रवेश केला आणि त्याचे फोटोसेशन सुद्धा केले. ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि शिवसेना गोटात एकच खळबळ माजली. शिवसेना पक्षश्रेष्ठींनी भोईर यांना दम मारताच त्यांनी विकासकामांसाठी भेट घेतल्याचे सांगितले.

[EPSB]

जेएनयू निवडणुकीत पुन्हा फडकला लाल झेंडा, गीता कुमारी अध्यक्षपदी

देशातील आणि जगातील अग्रगण्य युनिव्हर्सिटी जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थी संघटना निवडणुकीत युनायटेड लेफ्टने चारही जागा जिंकल्या आहेत.

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version