Home महामुंबई ‘कमळ’ चिन्हावर निवडणूक लढवण्यास रिपाइं कार्यकर्ते नाराज

‘कमळ’ चिन्हावर निवडणूक लढवण्यास रिपाइं कार्यकर्ते नाराज

0

मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपा आणि रिपब्लिकन पक्षाची महायुती झाल्याने रिपाइंच्या १९ अधिकृत उमेदवारांची यादी सोमवारी जाहीर करण्यात आली. 

मुंबई- मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपा आणि रिपब्लिकन पक्षाची महायुती झाल्याने रिपाइंच्या १९ अधिकृत उमेदवारांची यादी सोमवारी जाहीर करण्यात आली. या उमेदवारांत १२ महिला असून १ मातंग, २ ओबीसी, १ बंजारा, १ मुस्लिम, १ बंगाली आणि ५ बौद्ध उमदेवारांना प्राधान्य देण्यात आले आहे. असे असले तरी भाजपाच्या ‘कमळ’ चिन्हावर निवडणूक लढवण्यास रिपाइं कार्यकर्त्यांत तीव्र नाराजी आहे.

रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी महायुती केल्यानंतर रिपाइं उमेदवारांची अधिकृत यादी रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष माजी आमदार सुमंतराव गायकवाड, राष्ट्रीय उपाध्यक्ष तानसेन ननावरे, एस. एस. यादव आदी मान्यवरांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली.

भाजपा-रिपाइं(ए)च्या जागावाटप चर्चेत प्रारंभी ४५ जागांचा आणि त्यानंतर ३५ जागांचा प्रस्ताव देण्यात आला होता; मात्र २५ जागाच रिपाइंला सोडण्याचे भाजपाकडून निश्चित करण्यात आले. प्रत्यक्षात भाजपाकडून रिपाइंला १९ जागा सोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे रिपाइं कार्यकर्त्यांत प्रचंड नाराजी आहे. १९ उमेदवारांत १२ महिलांना संधी देण्यात आली असून त्यात १ मातंग, २ ओबीसी, १ बंजारा, १ मुस्लिम, १ बंगाली आणि ५ बौद्ध उमदेवारांना प्राधान्य देण्यात आले आहे.

वॉर्ड क्रमांक ५३ मध्ये स्वाती यादव, वॉर्ड क्रमांक १२० सोमा सरकार, वॉर्ड क्रमांक १२१ जगदेवी बनसोडे, वॉर्ड क्रमांक ९३ राणी वजाळे, १६७ सुरेखा जितेंद्र गांगुडे, १६९ श्रीकांत भिसे, वॉर्ड १३५ अश्विनी किसन पवार, वॉर्ड क्रमांक १३९ चंद्रकांत न्यायनिगुर्णे, १४२ कु. गीतांजली साठे, वॉर्ड क्रमांक १४६ अनीता जितेश काटकर, वॉर्ड क्रमांक १४७ मनीषा चेमटे, वॉर्ड क्रमांक १५० किसन माने, वॉर्ड क्रमांक १५२ सुनील बनसोडे, वॉर्ड क्रमांक १७३ विजय वाघमारे, वॉर्ड क्रमांक १८१ अस्मिता गजानन पाटील, वॉर्ड क्रमांक १९५ शिरीषकर शरद, वॉर्ड क्रमांक २१० शुभांगी शिंदे, वॉर्ड क्रमांक २२३ जुलेखा शेख यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version