Home महामुंबई रात्री दहानंतर बीन-आवाजाचा गरबा रंगणार

रात्री दहानंतर बीन-आवाजाचा गरबा रंगणार

0

गणेशोत्सवात डीजे बंदीवरून निर्माण झालेल्या वादळानंतर आगामी नवरात्रोत्सवातही ध्वनिप्रदूषणाचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

मुंबई- गणेशोत्सवात डीजे बंदीवरून निर्माण झालेल्या वादळानंतर आगामी नवरात्रोत्सवातही ध्वनिप्रदूषणाचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून मुंबईत सायलेंट गरब्याची चाचपणी काही आयोजकांनी सुरू केली आहे. त्यामुळे यंदा मुंबईत अनेक मोठे गरबे रात्री १० नंतर सायलेंट झालेले दिसण्याची शक्यता आहे.

मुंबईत गरब्यावर लाखो रुपये खर्च होतात. बॉलिवूड सेलिब्रिटींना आमंत्रित करण्यापासून ते खान-पान व्यवस्थेपर्यंत अनेक सुविधा पुरवण्यात येतात. त्यासाठी आयोजकांकडून भलीमोठी रक्कम तिकिटाच्या स्वरूपात घेण्यात येते. ध्वनिप्रदूषणामुळे रात्री १० नंतर गरबा बंद करण्यात येतो. त्यामुळे गरबा खेळण्यासाठी येणा-या तरुण-तरुणींचा हिरमोड होतो.

गरबा रात्री उशिरापर्यंत खेळता यावा म्हणून मुंबईतील काही बडय़ा गरबा आयोजकांनी त्यावर नामी शक्कल शोधली आहे. त्यामुळे पोलिसांकडून कायद्याच्या बडग्याचा त्रास होणार नसल्याचे आयोजकांकडून सांगण्यात येत आहे. जुहूतील मिलेनियम क्लब, ओशिवरा येथील हीरा-पन्नासह काही मॉल तसेच गोरेगाव-मालाडमधील बंदिस्त जागेमध्ये सायलेंट गरब्याची आयोजकांकडून चाचपणी सुरू आहे.

सायलेंट गरब्यामध्ये गरबाप्रेमी कॉर्डलेस हेडफोनवर संगीत ऐकत रात्री उशिरापर्यंत गरब्याच्या आनंद घेऊ शकतील. नेहमीप्रमाणे रात्री १० वाजेपर्यंत ऑर्केस्ट्रावर गरबा चालेल. त्यानंतर सायलेंट गरबा रात्री उशिरापर्यंत चालेल, अशी कल्पना काही आयोजकांच्या मनात आहे. त्यासाठी पोलीस परवानगी व अन्य सोपस्कार पूर्ण करण्यात येत आहेत.

[EPSB]

काँग्रेस सरस, भाजपला धक्का

दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला ‘जोर का झटका’ देत काँग्रेसची विद्यार्थी संघटना असलेल्या नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाने दणदणीत विजय मिळवला आहे.

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version