Home देश तर भारतीयांचे आयुष्य चार वर्षानी वाढू शकते

तर भारतीयांचे आयुष्य चार वर्षानी वाढू शकते

0

भारताने वायू प्रदूषणाबद्दल जागतिक आरोग्य संस्थेने घालून दिलेले निकष पाळल्यास प्रत्येक भारतीयाचे आयुष्य सरासरी ४ वर्षानी वाढेल, असे एनर्जी पॉलिसी इन्स्टिटय़ूटने अहवालात म्हटले आहे.

नवी दिल्ली- भारताने वायू प्रदूषणाबद्दल जागतिक आरोग्य संस्थेने घालून दिलेले निकष पाळल्यास प्रत्येक भारतीयाचे आयुष्य सरासरी ४ वर्षानी वाढेल, असे एनर्जी पॉलिसी इन्स्टिटय़ूटने अहवालात म्हटले आहे. एनर्जी पॉलिसी इन्स्टिटय़ूटने शिकागो विद्यापीठात ‘एअर क्वालिटी लाईफ इंडेक्स’बद्दलचा अहवाल सादर केला. यामध्ये भारताच्या विविध भागांमधील प्रदूषणाच्या समस्येवर प्रकाश टाकण्यात आला.

दिल्लीजवळील ‘नॅशनल कॅपिटल रिजन’मधील (एनसीआर) प्रदूषणाची स्थिती भीषण असल्याचे ‘एनर्जी पॉलिसी इन्स्टिटय़ूट’चा अहवाल सांगतो. ‘एनसीआर’मध्ये जागतिक आरोग्य संस्थेने आखून दिलेल्या निकषांचे पालन झाल्यास तेथील नागरिकांचे सरासरी वयोमान ९ वर्षानी वाढेल, असे ‘एनर्जी पॉलिसी इन्स्टिटय़ूट’ने अहवालात नमूद केले आहे. जागतिक आरोग्य संस्थेने घालून दिलेल्या निकषांनुसार प्रदूषण आटोक्यात आणले गेल्यास आग्य्रातील लोकांचे आयुष्य ८ वर्षानी, तर बरेलीतील लोकांचे आयुष्य ७.८ वर्षानी वाढेल, अशी अहवालातील आकडेवारी सांगते.

वायू प्रदूषणाशी संबंधित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय निकषांचे पालन करण्याची आवश्यकता अहवालातून अधोरेखित करण्यात आली. वायू प्रदूषणाचे प्रमाण मोजण्यासाठी वातावरणातील आठ प्रदूषके आणि त्यांचे प्रमाण यांचा विचार केला जातो. या प्रदूषकांच्या आधारे देशभरातील शहरांची सहा गटांमध्ये विभागणी केली जाते. राष्ट्रीय स्तरावरील निकषांचे पालन केल्यास देशातील नागरिकांचे सरासरी आयुष्य १.३५ वर्षांनी वाढू शकेल.

‘एनसीआर’मधील वायू प्रदूषणाचे प्रमाण अतिशय जास्त आहे. जागतिक आरोग्य संघटनेने वायू प्रदूषण आटोक्यात ठेवण्यासाठी निकष आखून दिले आहेत. मात्र ‘एनसीआर’मधील वायू प्रदूषणाने केव्हाच धोक्याची पातळी ओलांडली असून येथील हवा १० पटीने जास्त प्रदूषित आहे. या भागात जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांचे पालन केले गेल्यास, येथील लोकांचे वयोमान ९ वर्षानी वाढेल. तर राष्ट्रीय मानकांचे पालन केल्यास, येथील लोकांच्या सरासरी वयोमानात जवळपास ६ वर्षानी वाढ होईल.

[EPSB]

अवयवदान जागरूकता उपक्रम

आजच्या तरुण पिढीमध्ये सगळ्याच गोष्टींबाबत भरभरून कुतूहल भरलेले असून त्यांना देशात क्रांती घडवण्याची जबरदस्त इच्छा आहे. हे ध्येय गाठण्यासाठी या तरुणाईला सजगपणे निर्णय घेऊन आपल्या मतांना वाचा फोडायची आहे.

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version