Home टॉप स्टोरी राम रहीमचे देश-विदेशात कोट्यवधींचे घबाड

राम रहीमचे देश-विदेशात कोट्यवधींचे घबाड

0

ही एवढी संपत्ती कोठून आणि कशी आली याची कसून चौकशी आता ईडी करत आहे.

चंदिगड- बलात्कार प्रकरणात २० वर्षांसाठी तुरुंगात गेलेल्या बाबा राम रहीमची लाडकी मानसकन्या हनीप्रीत सिंगची डायरी डी-कोड करण्यात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) यश मिळवले आहे. यात डेरा सच्चा सौदाशी निगडित देश-विदेशातील कोट्यवधींच्या संपत्तीचे घबाड सापडले आहे.

गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये पोलिसांना हनीप्रीतकडे ही डायरी सापडली होती. ती डी-कोड करण्यासाठी ईडीला ११ महिने मेहनत करावी लागली. हनीप्रीतही पंचकुलामध्ये दंगल घडवण्याच्या आरोपावरून अंबाला कारागृहात कैदेत आहे.

पोलिसांना हनीप्रीतकडून मिळालेल्या डायरीत लिहिलेले शब्द समजत नव्हते. यानंतर ती डायरी ईडीकडे सोपवण्यात आली. यात ‘वायानाड केरला लैंड’, ‘मशीन वेट कम करने वाली’, ‘हिमाचल की लँड न्यू’, ‘दार्जिलिंग लँड’, ‘न्यू लँड ऑरेंज काउंटी की दुसरी तरफ’, ‘मनी ट्रान्सफर रिसॉर्ट टुडे’, ‘हिमाचल की लँड रिसॉर्ट के नाम करना’, ‘टीम्स फॉर वी ७ इन १२′, ’२५ दे दो गर्ग को’ आणि ‘संजू लँड गुडगाव’ यासारखे कोडवर्ड वापरण्यात आले होते. यानंतर काही हिशेबही लिहिलेला होता. यादरम्यान जवळजवळ २० कोटींपेक्षा जास्त प्रॉपर्टीचा खुलासा झाला आहे.

ईडीच्या चौकशीत राजस्थानात ३० एकर, हरियाणात १०५ एकर, उत्तरप्रदेशात १५ एकर आणि उत्तराखंडमध्ये १९ एकर प्रॉपर्टी असल्याचे समोर आले आहे. याशिवाय अमेरिकेसहित अनेक देशविदेशात जागांवर बनलेल्या आश्रमांची जमीनही खरेदी करण्यात आली आहे. ही एवढी संपत्ती कोठून आणि कशी आली याची कसून चौकशी ईडी करत आहे.

हनीप्रीत ही बाबाची मानलेली मुलगी होती असे बाबा राम रहीम दावा करत होता. मात्र या दोघांमध्ये भलतेच संबंध असल्याचे आरोप करण्यात आले आहेत. ती विदेशात पळून जाण्याच्या तयारीत असतानाच तिला अटक करण्यात आली. तिच्याकडून जो पासपोर्ट जप्त करण्यात आला आहे त्यावर प्रियांका तनेजा असे नाव लिहलेले आहे.

बाबा राम रहीमने पोलिसांना १० लोकांची नावे दिली आहेत. ज्यांना त्याला भेटण्याची परवानगी देण्यात यावी, अशी त्याची विनंती आहे. या यादीमध्ये हनीप्रीतचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version