Home महामुंबई ‘देवसेना’ अनुष्का शेट्टी १४० कोटी रुपये संपत्तीची मालकीण!

‘देवसेना’ अनुष्का शेट्टी १४० कोटी रुपये संपत्तीची मालकीण!

0

‘बाहुबली’ सिनेमात झळकलेली अभिनेत्री अनुष्का शेट्टी हिची बी-टाऊनसह दाक्षिणात्य चित्रसृष्टीत सुपरडुपर हिट ठरली आहे.

मुंबई- ‘बाहुबली’ सिनेमात झळकलेली अभिनेत्री अनुष्का शेट्टी हिची बी-टाऊनसह दाक्षिणात्य चित्रसृष्टीत सुपरडुपर हिट ठरली आहे. जादा मानधनाची मागणी केल्याच्या कारणामुळे अनुष्का शेट्टीची ‘साहो’ या सिनेमातून एक्झिट झाल्याची चर्चा आहे. मात्र साहोमधून तीची एक्झिट झाली तरी तीला फारसा फरक पडणार नाही. मानधन तिच्यासाठी किरकोळ गोष्ट आहे.

कारण एका वृत्तानुसार अनुष्का शेट्टी २२ मिलियन डॉलर म्हणजेच तब्बल १४० कोटी रुपये संपत्तीची मालकीण आहे. हैदराबादमधील पॉश वसाहतींपैकी एक ज्युबली हिल्स इथल्या वुड्स अपार्टमेंटमध्ये सहाव्या मजल्यावर अनुष्काचे आलिशान आणि प्रशस्त घर आहे. आलिशान कारची शौकिन असलेल्या अनुष्काकडे विविध ब्रँड्सच्या कार आहेत. यांत बीएमडब्ल्यू ६, ऑडी ए ६, ऑडी क्यू ६ आणि टोयोटा करोला अशा आलिशान कारचा समावेश आहे. याशिवाय विविध बडय़ा कंपन्यांची उत्पादनं आणि ज्वेलर्स ब्रँडच्या जाहिरातीसुद्धा अनुष्काकडे आहेत.

अनुष्काकडे इतकी संपत्ती आहे की तिने एकदा आपल्या ड्रायव्हरला १२ लाख रुपयांची आलिशान कार भेट म्हणून दिली होती. हिंदीसह अनेक तेलुगू आणि तमिळ सिनेमात अनुष्का झळकली आहे. स्वीटी शेट्टी असं खरं नाव असलेल्या अनुष्काचा जन्म ७ नोव्हेंबर १९८१ मध्ये झाला आहे. २००५ साली आलेल्या ‘सुपर’ या तेलुगू सिनेमातून अनुष्काने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली आहे. अनुष्काने बाहुबली या सिनेमासह विक्रमारकुडू, अरुंधती, वेदम, रुद्रमादेवी, सिंघम सीरीज अशा सुपरहिट सिनेमांमध्ये काम केले आहे. एका सिनेमासाठी अनुष्का जवळपास ४ ते ५ कोटी रुपये इतकं मानधन स्वीकारते. त्यामुळे साहजिकच तिची संपत्ती १४० कोटींवर आहे.

[EPSB]

बँक लुटण्यासाठी चोरटय़ांनी खोदले ६०० मीटरचे भुयार

ब्राजीलच्या साओ पावलो पोलिसांनी १६ चोरांच्या टोळीला अटक केली आहे. ही टोळी ब्राझीलच्या नॅशनल बँकेवर सर्वात मोठा दरोडा

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version