Home देश राहुलपाठोपाठ अमित शहा अमेठीमध्ये

राहुलपाठोपाठ अमित शहा अमेठीमध्ये

0

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नुकताच अमेठी लोकसभा मतदारसंघाचा तीन दिवसांचा दौरा केला.

नवी दिल्ली- काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नुकताच अमेठी लोकसभा मतदारसंघाचा तीन दिवसांचा दौरा केला. राहुल गांधीच्या दौ-यापाठोपाठ आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेही १० ऑक्टोबरला अमेठीचा दौरा करणार आहेत. विशेष म्हणजे अमित शहा हे अमेठी लोकसभा मतदारसंघातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात मेळावे घेणार आहेत.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाचा येथे पराभव झाला होता. राहुल गांधीच्या अमेठी दौ-याच्या पार्श्वभूमीवर भाजपने हा निर्णय घेतल्याचे बोलले जाते. येत्या १० ऑक्टोबरपासून या दौ-याची सुरुवात होणार असून या मोहिमेचा प्रभाव अमेठी मतदारसंघालगतच असलेल्या रायबरेली या मतदारसंघावरही पडेल याची पुरेपूर व्यवस्था भाजपने केली आहे. रायबरेली हा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा मतदारसंघ आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा या दोन मतदारसंघातच विजय झाला होता. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि नितीन गडकरी हेही अमित शहा यांच्याबरोबर या मोहिमेत सहभागी होतील.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष महेंद्रनाथ सिंह, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि डॉ. दिनेश शर्मा हे नेते या दौ-यात शहा यांच्याबरोबर असतील, असे वृत्त ‘डीएनए’ने दिले आहे. मागील लोकसभा निवडणुकीत स्मृती इराणी यांचा या मतदारसंघातून राहुल गांधी यांच्याकडून पराभव झाला होता. परंतु, राहुल यांचे मताधिक्य हे ३.७ लाखांवरून १.०७ लाखांपर्यंत कमी झाले होते.

या दौ-यात योगी आदित्यनाथ हे विविध प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. यामध्ये सैनिकी शाळा, एफएम रेडिओ स्टेशन, तिलोई, जगदीशपूर आणि गौरीगंज येथे ३ आयटीआय तसेच दोन शेतकी विज्ञान केंद्राचा यात समावेश आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पिप्री गावातील नियोजित धरणाचे भूमिपूजनही होणार आहे.

[EPSB]

जीएसटी लागू करण्यात घाई : राहुल गांधी

जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कराच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारने जी घाई केली, त्याचमुळे देशात बेरोजगारीचे संकट निर्माण झाले, असा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला.

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version