Home देश अॅमम्बी व्हॅलीच्या रकमेवर आयकर विभागाचा दावा

अॅमम्बी व्हॅलीच्या रकमेवर आयकर विभागाचा दावा

0

सहारा उद्योगसमूहाची वलयांकित मालमत्ता असलेल्या अ‍ॅम्बी व्हॅलीच्या लिलाव प्रक्रियेला गेल्या महिन्यात सुरुवात झाली होती.

नवी दिल्ली- सहारा उद्योगसमूहाची वलयांकित मालमत्ता असलेल्या अ‍ॅम्बी व्हॅलीच्या लिलाव प्रक्रियेला गेल्या महिन्यात सुरुवात झाली होती. मात्र, आता आयकर विभागाने अचानकपणे या लिलाव प्रक्रियेतून मिळणा-या एकूण रक्कमेपैकी २४ हजार कोटींवर दावा सांगितला आहे. उच्च न्यायालयाने नेमणूक केलेल्या अधिका-यांकडून सध्या या मालमत्तेचा लिलाव सुरू आहे. या लिलावासाठी ३७ हजार, ३९२ कोटी रुपये राखीव किंमत ठरवण्यात आली होती. त्यानंतर या लिलावासाठी बोली लावण्याची प्रक्रियाही सुरू झाली होती.

मात्र, आता अचानकपणे आयकर विभागाने लिलावातून मिळणा-या २४,८४३ कोटी इतक्या रकमेवर दावा केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अ‍ॅम्बी व्हॅली लिमिटेडने मोठय़ा प्रमाणावर कर थकवला होता. त्या रकमेवरील व्याज वगळता कराची ही रक्कम २४ हजार कोटींच्या घरात पोहोचली होती. दरम्यान, आजपासून अ‍ॅम्बी व्हॅलीच्या लिलाव प्रक्रियेतील नवा टप्पा सुरू होणार आहे. सुप्रीम कोर्टाने यापूर्वी सहारा प्रमुख सुब्रतो रॉय यांना ७ सप्टेंबपर्यंत १५०० कोटी जमा करण्याचे आदेश दिले होते. तसे केल्यासच अ‍ॅम्बी व्हॅलीच्या लिलाव प्रक्रियेला स्थगिती देण्यात येईल, असे कोटार्ने सांगितले होते. आयकर विभागाने केलेल्या ऑडिटमध्ये कंपनीने २०१२-१३ या आर्थिक वषार्तील ४८ हजार कोटींचे उत्त्पन्न लपवून ठेवल्याची माहिती समोर आली होती.

त्यानंतर अ‍ॅम्बी व्हॅली लिमिटेडला कर आणि दंडापोटी २४,६४६ कोटी रुपए इतकी रक्कम भरण्याची नोटीस पाठवण्यात आली होती. अ‍ॅम्बी व्हॅलीचा लिलाव सुरू करताना त्यातील टिंबर चॅलेट्स, मॉडर्न व्हिला, गोल्फ कोर्स, रुग्णालय, शाळा व विमानतळ यासारख्या सुविधांचाही लिलाव होणार आहे. लिलावांतर्गत एकूण सहा हजार ७६१.६० एकर जागेचा लिलाव होणार आहे. याला जोडून १७०० एकरांच्या दोन जागांचाही लिलाव केला जाईल. यापूर्वी मॉरिशसमधील रॉयल पार्टनर्स इन्वेस्टमेंट फंड या कंपनीने अ‍ॅम्बी व्हॅलीमध्ये १० हजार ७०० कोटी रुपये गुंतवण्याची तयारी दर्शवली होती. तर सहारा समुहाच्या मते अ‍ॅम्बी व्हॅलीचे बाजारमूल्य १ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे आता अ‍ॅम्बी व्हॅलीच्या लिलावाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

[EPSB]

निसर्गबदलामुळे आजारही गंभीर

जोपर्यंत माणसे नीतिधर्माने वागत होती तोपर्यंत पृथ्वीवरील ऋतुचक्र नित्यनेमे फिरत होते.

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version