Home टॉप स्टोरी गोभक्त मोदी,हिंदूंपासून भारताला मुक्त करु-मुसाची धमकी

गोभक्त मोदी,हिंदूंपासून भारताला मुक्त करु-मुसाची धमकी

0

दहशतवादी संघटना हिजबूल मुजाहिद्दीनचा माजी कमांडर आणि अल-कायदाचा दहशतवादी असलेला झाकीर मुसाने पुन्हा एकदा भारताला धमकी दिली.

नवी दिल्ली- दहशतवादी संघटना हिजबूल मुजाहिद्दीनचा माजी कमांडर आणि अल-कायदाचा दहशतवादी असलेला झाकीर मुसाने पुन्हा एकदा भारताला धमकी दिली. गायीची पुजा करणारे नरेंद्र मोदी आणि हिंदूपासून भारताला मुक्त करू, असा इशारा मुसाने दिला आहे. बकरी ईदच्या दोन दिवस आधी दहा मिनिटाचा व्हिडिओ जारी करून त्याने ही धमकी दिली आहे.

मुसाने या ऑडिओ क्लिपमध्ये नरेंद्र मोदी, हिंदू आणि जम्मू-काश्मीरमधील मुस्लिम याविषयावर भाष्य केले आहे. गोपूजक नरेंद्र मोदी राजकारण आणि कुटनितीद्वारा अनेक लोकांना गोळा करू शकतात. पण ते आम्हाला रोखू शकत नाही. आम्ही भारतावर इस्लामी झेंडा फडकविल्याशिवाय राहणार नाही, असे तो म्हणाला आहे.

यावेळी झाकीर मुसाने रोहिंग्या मुस्लिमांना निर्वासित करण्यावरुन केंद्र सरकारला चेतावणी दिली आहे. देशभरात बेकायदेशीररित्या राहणाऱ्या सुमारे ४० हजार रोहिंग्या मुस्लिमांना पुन्हा मायदेशी पाठवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यातील सहा हजार रोहिंग्या मुस्लिम हे जम्मूत राहतात. या निर्णयाचा झाकीर मुसाने विरोध दर्शवला.

आपल्या या ऑडिओ क्लिपमध्ये मुसा पाकिस्तानविरोधातही बोलला आहे. ‘काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी लढणा-या तरुणांचा पाकिस्तानी लष्कर आणि सरकारने विश्वासघात केला आहे. अमेरिकेला साथ देत, त्याच्या फूस लावण्यावरुन पाकिस्तानने दहशतवाद्यांचे अनेक ट्रेनिंग कॅम्प बंद केले आहेत. इतकेच नाही तर काश्मीरमधील अनेक मुजाहिद्दीन त्यांच्या ताब्यात आहेत’, असे मुसा म्हणाला.

काश्मीरचा लढा आपल्या इतर सहका-यांसाठी प्रेरणास्त्रोत असल्याचेही मुसाने सांगितले असून काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी सुरु असलेल्या लढाईत आपल्याला कोणाच्याही मदतीची गरज नाही, असे सांगत झाकीर मुसाने पाकिस्तानला सुनावले आहे.  झाकीर मुसाच्या क्लिपची जम्मू-काश्मीर पोलिसांनी दखल घेतली आहे. या क्लिपची चौकशी सुरु असल्याचे सूत्रांनी सांगितले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version