Home देश भाजपला मते देणा-या जनतेला पश्चात्ताप

भाजपला मते देणा-या जनतेला पश्चात्ताप

0

उत्तर प्रदेशात भाजप सत्तेत येऊन सहा महिने झाले आहेत. पण या सरकारकडून कोणतीही कामे होणार नाहीत हे जनतेला समजले आहे.

लखनऊ- उत्तर प्रदेशात भाजप सत्तेत येऊन सहा महिने झाले आहेत. पण या सरकारकडून कोणतीही कामे होणार नाहीत हे जनतेला समजले आहे. भाजपला मते देणा-या जनतेला आता पश्चातापहोत आहे, असे सांगून माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी योगी आदित्यनाथ सरकारवर हल्लाबोल केला आहे. समाजवादी पक्षाच्या राज्यस्तरीय अधिवेशनात ते बोलत होते.

भाजपकडे विकासाचे मुद्दे नाहीत. निवडणुका जवळ आल्या की कोणता न कोणता नवा ‘फॉर्म्युला’ ते घेऊन येतात. आमच्या सरकारच्या काळात आम्ही समाज हिताच्या योजना सुरू केल्या आणि भाजप सरकारने विकासाच्या योजना बंद केल्या, असे अखिलेश म्हणाले. राज्यातील योगी आदित्यनाथ सरकारने समाजवादी पेन्शन योजना बंद केली. मेट्रो आम्ही सुरू केली आणि ते मात्र हा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न असल्याचे सांगत आहेत. किरकोळ कर्जमाफी करून त्यांनी शेतक-यांची थट्टा केली, असा आरोपही त्यांनी केला.

गोरखपूरमधील रुग्णालयातील बालमृत्यू प्रकरणावरून अखिलेश यांनी योगी आदित्यनाथांवर निशाणा साधला. आपले मुख्यमंत्री गोरखपूरचे आहेत. पण तिथेच सर्वाधिक मृत्यू झाले आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला. उत्तर प्रदेशातील राजकारण खूपच महत्त्वाचे आहे. आता आपण सरकारमध्ये नाहीत. जनतेने भाजपला भरभरून मते दिली. समाजवादी पक्षालाही दिली. पण सत्तेत येऊ शकलो नाहीत, असेही त्यांनी कार्यकर्त्यांनी सांगितले. भाजपला मते देणा-या जनतेला आता पश्चाताप होत आहे. आपण कुणाला मते दिली, याचा विचार मतदार करत आहेत. भाजप राज्यात कोणतीही विकासकामे करणार नाही हे त्यांना समजले आहे, असेही ते म्हणाले.

[EPSB]

अमेरिकेतील वादळामुळे पेट्रोल दरवाढ

अमेरिकेत आलेल्या वादळामुळे भारतात पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले आहेत, असे अजब विधान केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी केले आहे.

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version