Home देश दिवाळी कसली दिवाळं काढलं!

दिवाळी कसली दिवाळं काढलं!

0

वस्तू आणि सेवा कर परिषदेत घेतलेल्या नव्या निर्णयामुळे यंदा दिवाळी लवकर आल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले होते. मोदींच्या या विधानाचा काँग्रेसने जोरदार समाचार घेतला आहे.

नवी दिल्ली- वस्तू आणि सेवा कर परिषदेत घेतलेल्या नव्या निर्णयामुळे यंदा दिवाळी लवकर आल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले होते. मोदींच्या या विधानाचा काँग्रेसने जोरदार समाचार घेतला आहे. ‘यंदा दिवाळी कसली, देशातील लोकांचे दिवाळे निघाले आहे,’ अशा शब्दांमध्ये काँग्रेसने नरेंद्र मोदींच्या विधानावर टीका केली. वस्तू आणि सेवा करातील बदलांमुळे देशातील आर्थिक स्थिती बदलणार नाही, असेही काँग्रेसने म्हटले.

वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या बैठकीनंतर बोलताना यंदा देशवासीयांसाठी दिवाळी लवकर आल्याचे मोदींनी म्हटले होते. वस्तू आणि सेवा करात झालेल्या बदलांमुळे देशात आनंद साजरा होईल, असेही त्यांनी म्हटले. मोदींच्या या विधानावर काँग्रेसने जोरदार टीका केली आहे. ‘देशवासियांसाठी यंदा दिवाळी लवकर आली आहे, असे म्हणून मोदींनी चूक केली. त्यापेक्षा त्यांनी दिवाळे शब्द वापरायला हवा होता. वस्तू आणि सेवा करातील बदलांचा दाखला देऊन देशात दिवाळी लवकर आली आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणतात. मात्र या बदलांमुळे देशातील परिस्थिती बदलणार नाही.

देशातील लोकांसमोरील अडचणी कायम राहणार आहेत. या सरकारने लोकांच्या आशा-अपेक्षा पूर्ण केलेल्या नाहीत. देशातील लोकांचा भ्रमनिरास सुरूच आहे,’ अशा शब्दांमध्ये काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांनी मोदींच्या विधानावर तोंडसुख घेतले. काँग्रेसचे प्रवक्ते अजॉय कुमार यांनीही मोदी सरकारवर जोरदार टीका केली. ‘जेव्हा भाजप सत्तेतून जाईल, तेव्हाच देशातील जनता दिवाळी साजरी करेल,’ अशा शब्दांमध्ये कुमार यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. ‘पंतप्रधान मोदी फक्त श्रीमंतांचा आणि उद्योगपतींचा विचार करतात. ते मध्यम आणि कनिष्ठ मध्यम वर्गाचा कोणताही विचार करत नाहीत. वस्तू आणि सेवा करातील बदलांमधून त्याचाच प्रत्यय येतो. त्यामुळे ज्यावेळी भाजपचे सरकार जाईल, तेव्हाच खरीखुरी दिवाळी साजरी होईल,’ असे कुमार यांनी म्हटले.

[EPSB]

शेतक-यांना भेटायला वेळ नाही का?- धनंजय मुंडेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

कीटकनाशकांच्या फवारणीदरम्यान झालेल्या विषबाधेतून मृत पावलेल्या शेतक-यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे वेळ नाही का?, असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी उपस्थित केला.

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version