आई..

0

आई..

जीवनाची सुरुवात माझ्या
झाली तुझ्या उदराने
चालण्याची उमेद मला
दिलीस हाताच्या आधाराने

जग हे मला दाखवलेस
उरी तुझ्या जन्म देऊन,
घास मला भरविलेस
स्वत: उपाशी राहून

आयुष्यातील तुझ्या दु:खांची
करून सदैव ओहोटी,
मातृत्वाच्या अथांग सागरातून
केलीस संस्कारांची भरती

ना शकणार ना ही रूकनार
या जगण्याच्या वादळातून,
लढण्याची जिद्द मला
मिळते तुझ्या संघर्षातून.

सलाम तुझ्या वाटचालीस
सुखाची किनार नाही त्याला,
शपथ आहे तुझ्या वारसाची
यापुढे दु:खाची झळही
नसेल तुला

मुलगा म्हणून माझी कर्तव्ये
कितीही पार पडली जरी
कवडीचेही पांग तुझे
फिटणार नाही तरी

आई तुझ्या कुशीतच
खरा स्वर्ग आहे
क्षणभंगुर सर्व सुखांपेक्षा
नेहमीच वरचढ आहे.

 

[EPSB]

कर्जमाफीची रक्कम ऑक्टोबरमध्ये शेतक-यांच्या खात्यात जमा होणार!

प्रक्रिया जलदगतीने राबविण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे निर्देश, ६९ लाख शेतक-यांनी केली नोंदणी;

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version