Home टॉप स्टोरी एलपीजी अनुदानासाठी आधारकार्ड बंधनकारक

एलपीजी अनुदानासाठी आधारकार्ड बंधनकारक

0

सरकारने घरगुती गॅस सिलिंडरवरील (एलपीजी) अनुदान मिळवण्यासाठी आधारकार्ड बंधनकारक केले आहे. 

नवी दिल्ली- सरकारने घरगुती गॅस सिलिंडरवरील (एलपीजी) अनुदान मिळवण्यासाठी आधारकार्ड बंधनकारक केले आहे. ज्यांच्याकडे आधारकार्ड क्रमांक नसेल त्यांना ३० नोव्हेंबपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

सरकार दरवर्षी ग्राहकांना बारा अनुदानित सिलिंडर देते. त्यावरील अनुदान थेट ग्राहकांच्या बॅँक खात्यात आगाऊ जमा होते. त्यामुळे हे अनुदान मिळवण्यासाठी आता ग्राहकांना आधारकार्ड अनिवार्य करण्यात आले आहे.

यापुढे आधार कार्ड क्रमांक पुरावा म्हणून सादर करावा लागणार आहे. पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने या संदर्भात आदेश काढला आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे आधारकार्ड क्रमांक नाही, त्यांना आधारकार्ड काढण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. असे केल्याने व्यवहार पारदर्शक आणि सोपा होईल.

गरज भासल्यास गॅस कंपन्यांनी ग्राहकांना आधार कार्ड नोंदणीची व्यवस्था करून द्यावी, असे सरकारने सांगितले आहे. गॅस कंपनीच्या संकेतस्थळावर अथवा वितरकांकडे आधार कार्ड नोंदणीची व्यवस्था करण्यास सांगण्यात आले आहे.

दरम्यान जम्मू-काश्मीर, आसाम, मेघालय वगळता अन्य राज्यात याची तात्काळ अंमलबजावणी करण्याचा आदेश सरकारने दिला आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version