Home टॉप स्टोरी जेएनयू प्रकरण-तीघांविरोधात लुकआउट नोटिस

जेएनयू प्रकरण-तीघांविरोधात लुकआउट नोटिस

0
संग्रहीत छायाचित्र

दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) भारतविरोधी घोषणा दिल्या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी तीनजणांविरोधात लुकआउट नोटिस जारी केली आहे. 

संग्रहीत छायाचित्र

नवी दिल्ली- दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) भारतविरोधी घोषणा दिल्या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी तीनजणांविरोधात लुकआउट नोटिस जारी केली आहे. शनिवारी पोलिसांनी ही नोटीस जारी केली.

उमर खालीद, अनिर्बान आणि रियाज या तिघांविरोधात दिल्ली पोलिसांनी नोटिस जारी केली आहे.

या नोटिसमध्ये सर्व विमानतळ, बंदरे आणि तपास अधिका-र्यांना सतर्क राहण्यास सांगितलेले आहे. या तिघांपैकी कुणी देश सोडून जाण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना त्वरित अटक करा, असे या नोटिसमध्ये म्हणण्यात आले आहे.

जेएनयू परिसरात नऊ फेब्रुवारीला अफजल गुरुच्या समर्थनार्थ आयोजित सभेत भारताविरोधी घोषणाबाजी झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी जेएनयू विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमारला याला देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version