Home क्रीडा संदीप पाटील निवड समितीचे नवे अध्यक्ष

संदीप पाटील निवड समितीचे नवे अध्यक्ष

0

मुंबईत झालेल्या बीसीसीआयच्या निवड समितीच्या अध्यक्षपदी  भारताचे माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांची वर्णी लागली.

 

मुंबई – मुंबईत झालेल्या बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत नव्या निवड समितीची घोषणा करण्यात आली. निवड समितीचे अध्यक्ष म्हणून भारताचे माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांची वर्णी लागली. पश्चिम विभागाचे सिलेक्टर म्हणून पाटील यांची निवड झाली आहे.श्रीकांत यांचे उत्तराधिकारी म्हणून पाटील यांची निवड झाली. पाटील यांचा कार्यकाळ चार वर्षांचा असेल.

श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीत असलेले मोहिंदर अमरनाथ यांची फेरनिवड होऊ शकली नाही. त्याशिवाय पूर्व विभागातून साबा करिम, दक्षिण विभागातून रॉजन बिन्नी, उत्तर विभागातून विक्रमसिंग राठोड तर मध्य विभागातून राजेंदरसिंग हंस यांची सिलेक्शन पॅनलवर निवड झाली.

संदीप पाटील यांची कारकीर्द

  • २९ कसोटी आणि ४५ वनडे खेळलेले पाटील यांनी भारताचे आणि केनियाचे प्रशिक्षकपद यापूर्वी भूषवले आहे.
  • कसोटीत एका षटकात सलग सहा चौकार फटकवण्याचा पराक्रम त्यांच्या नावावर आहे. इंग्लंडचे बॉब विलिस यांच्या षटकात पाटील यांनी १९८१-८२च्या हंगामात हा पराक्रम केला होता.
  • पाटील हे ‘बीसीसीआय’चा विरोध असलेल्या इंडियन क्रिकेट लीगमध्ये प्रशिक्षक म्हणून सहभागी झाले होते. मात्र नंतर ते बीसीसीआयच्या मुख्य प्रवाहात आले. त्यानंतर त्यांची बंगळूरुतील राष्ट्रीय क्रिकेट अ‍ॅकॅडमीच्या संचालकपदीही वर्णी लागली होती.


NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version