Home टॉप स्टोरी २०२८ मध्ये लोकसंख्येत भारताचा नंबर १

२०२८ मध्ये लोकसंख्येत भारताचा नंबर १

0

२०२८ पर्यंत भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश ठरण्याची शक्यता आहे.

संयुक्त राष्ट्रसंघ–  जागतिक लोकसंख्येसंबंधी संयुक्त राष्ट्राचा अहवाल प्रसिध्द झाला आहे. या अहवालानुसार २०२८ पर्यंत भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश ठरण्याची शक्यता आहे. २०२८ मध्ये भारत आणि चीन या दोन्ही देशांची लोकसंख्या १.४५ अब्ज असेल.

त्यानंतर भारताच्या लोकसंख्येत सतत वाढ होत राहील तर, चीनच्या लोकसंख्येत घट होईल असा या अहवालाचा अंदाज आहे. अहवालानुसार सध्या संपूर्ण जगाची लोकसंख्या ७.२ अब्ज आहे. पुढील बारावर्षात या लोकसंख्येत आणखी एक अब्जाची भर पडण्याची शक्यता आहे.

२०५० मध्ये संपूर्ण जगाची लोकसंख्या ९.६ अब्ज असू शकते असा अंदाज या अहवालात वर्तवण्यात आला आहे. विकसनशील देशातील लोकसंख्येत सातत्याने वाढ होणार असल्याचे अहवालात म्हटले आहे. सध्या लोकसंख्या वाढीची गती कमी आहे. मात्र अफ्रिका खंडातील विकसनशील देशांमध्ये लोकसंख्या वेगाने वाढत असल्याचे अहवालात म्हटले आहे.

युरोपियन लोकसंख्येत १४ टक्क्यांनी घट होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. २१०० पर्यंत संपूर्ण जगाची लोकसंख्या १०.९ अब्ज असेल असा अहवालाचा अंदाज आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version