Home क्रीडा २०२२ हिवाळी ऑलिम्पिकच्या यजमानपदासाठी बिजींग आणि अलमाटीमध्ये चुरस

२०२२ हिवाळी ऑलिम्पिकच्या यजमानपदासाठी बिजींग आणि अलमाटीमध्ये चुरस

0
संग्रहित छायाचित्र

२०२२ हिवाळी ऑलिम्पिकचे यजमानपद मिळवण्यासाठी बिजींग आणि अलमाटी या दोन शहरांमध्ये चढाओढ सुरु आहे.

संग्रहित छायाचित्र

कौलालंपूर – २०२२ हिवाळी ऑलिम्पिकचे यजमानपद मिळवण्यासाठी बिजींग आणि अलमाटी या दोन शहरांमध्ये चढाओढ सुरु आहे.

ऑलिम्पिक संघटनेच्या प्रतिनिधी देशांची जास्तीत जास्त मते आपल्या बाजूने वळवण्यासाठी दोन्ही बाजूंकडून जोरदार प्रचार सुरु आहे.

चीन आणि कझाकस्तान या दोन्ही देशांची उच्चस्तरीय शिष्टमंडळे कौलालंपूरमध्ये आहेत. दोन्ही स्पर्धक शहरांमधून विजेता निवडण्यासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती शुक्रवारी गुप्त मतदान घेणार आहे.

दोन्ही शहरांमधून विजेता कोणी ठरला तरी, सलग दुस-यांदा हिवाळी ऑलिम्पिकचे यजमानपद आशिया खंडाकडे येणार आहे. २०१८ ची हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा दक्षिणकोरियाच्या प्यॉंगचॅंग शहरात होणार आहे.

यजमानपदाच्या शर्यतीत चीनचे बिजींग शहर आघाडीवर होते मात्र मागच्या काही आठवडयात चित्र पालटले असून, अलमाटीला पसंती देणा-या देशांची संख्या वाढली आहे.

यजमानपद मिळवण्यासाठी चीनकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत यासाठी चीन २००८ च्या बिजींग ऑलिम्पिकच्या यशस्वी आयोजनाचे उदहारण देत आहे. मध्य आशियातील तेल संपन्न कझाकस्ताननेही यजमानपद मिळवण्यासाठी कंबर कसली आहे.

स्पर्धेसाठी आवश्यक असलेल्या सर्व सोयी सुविधा खेळाडूंना मिळतील असे आश्वासन कझाकस्तानने दिले आहे. चीनने बाजी मारली तर, मुख्य ऑलिम्पिक स्पर्धा आणि हिवाळी ऑल्मिपिक आयोजित करणारे बिजींग जगातील पहिले शहर ठरेल.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version