Home क्रीडा १५ वर्षीय शार्दूलची ‘रौप्य’ कामगिरी

१५ वर्षीय शार्दूलची ‘रौप्य’ कामगिरी

0

नेमबाजी डबलट्रॅप प्रकारातील सुवर्णपदक एक शॉटने हुकले

जकार्ता/पॅलेमबँग – भारताचा १५ वर्षीय नेमबाज शार्दूल विहान याने आशियाई क्रीडा स्पर्धेत डबलट्रॅप प्रकारामध्ये रौप्यपदक पटकावले. त्याचे सुवर्णपदक अवघ्या एका शॉटने हुकले.

अंतिम फेरीत विहान याने कोरियाचा ३४ वर्षीय शिन युनवू याला चांगलीच चुरस दिली. शिन याने ७४ शॉट लगावले. दुस-याला स्थानावरील विहानने ७३ शॉट लगावले. कतारचा अल मॅरी हमद अली याला (५३ शॉट) कांस्यपदक मिळाले.

राठोड, बिंद्रासह सोधी यांच्याकडून कौतुक
केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोड यांच्यासह ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा आणि २०१० ग्वांगजो आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता रंजन सोधी तसेच अनेक माजी क्रीडापटूंनी शार्दूल याचे अभिनंदन केले आहे.

नववीतील विद्यार्थी
विहान हा मीरत येथील (उत्तर प्रदेश) असून तो नववीचा विद्यार्थी आहे. तीन वर्षापूर्वी त्याने व्यावसायिक नेमबाजी स्पर्धामध्ये पाऊल ठेवले. २०१७मध्ये नवी दिल्लीत झालेल्या ६१व्या राष्ट्रीय शॉटगन स्पर्धेत विहानने चार सुवर्णपदके मिळवली होती. गेल्या वर्षी मॉस्कोमध्ये (रशिया) झालेल्या आयएसएसएफ कनिष्ठ जागतिक स्पर्धेत त्याला सहावे स्थान मिळाले होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version