Home महामुंबई ठाणे १४ वर्षीय मुलीवर बलात्कार

१४ वर्षीय मुलीवर बलात्कार

0

नालासोपारा पूर्व येथील ओसवाल नगरीत एका १४ वर्षीय मुलीवर ३५ वर्षीय व्यक्तीने बलात्कार केल्याची माणुसकीला काळिमा फासणारी घटना मंगळवारी उघडकीस आली आहे.

विरार : नालासोपारा पूर्व येथील ओसवाल नगरीत एका १४ वर्षीय मुलीवर ३५ वर्षीय व्यक्तीने बलात्कार केल्याची माणुसकीला काळिमा फासणारी घटना मंगळवारी उघडकीस आली आहे. पीडित मुलीच्या तक्रारीनंतर नालासोपारा पोलिसांनी मनोज यादव याला अटक केली आहे.

पीडित १४ वर्षीय मुलगी १८ सप्टेंबर रोजी दुपारी मॅगी आणण्यासाठी दुकानात जात असताना, मनोज यादव याने तिला बाजूच्याच एका खोलीत नेले. तिथे तिला ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला.

या घटनेमुळे घाबरलेल्या मुलीने याबाबत कुणाकडेही वाच्यता केली नव्हती. सतत अस्वस्थ असलेल्या या मुलीने शेवटी ही घटना शेजारी राहणा-या महिलेला सांगितली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version