Home विदेश हेडली-राणा यांच्या शिक्षेची सुनावणी पुढे ढकलली

हेडली-राणा यांच्या शिक्षेची सुनावणी पुढे ढकलली

0

मुंबईतील २६/११ दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमांईंड डेव्हिड कोलमन हेडलीला अमेरिकेच्या न्यायालयात १७ जानेवारीला शिक्षा सुनावण्यात येणार होती. मात्र आता तारखेत बदल करण्यात आला आहे.

शिकागो – मुंबईतील २६/११ दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमांईंड डेव्हिड कोलमन हेडलीला अमेरिकेच्या न्यायालयात १७ जानेवारीला शिक्षा सुनावण्यात येणार होती. मात्र आता तारखेत बदल करण्यात आला आहे. हेडलीला आता २४ जानेवारीला शिक्षा सुनावण्यात येणार आहे.

मूळचा पाकिस्तानी नागरिक असलेला हेडली अमेरिकन नागरिक आहे. आणि तो लष्कर ए तैयब्बा या अतिरेकी संघटनेसाठी काम करतो.२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात त्याने ताज, नरिमन हाऊस या भागात रेकी केली होती.

दरम्यान, हेडलीने स्वत: फाशीच्या शिक्षेपासून वाचण्यासाठी अमेरिकन गुप्तहेर संघटना एफबीआयला एक याचिका सादर केली आहे. या याचिकेमुळेच हेडलीच्या शिक्षेची तारीख २४ जानेवारी करण्यात आली आहे.

हेडलीसोबतचं, त्याचा साथीदार तहुवीर राणा याच्या शिक्षेची तारीखही १५ जानेवारीवरुन १७ जानेवारी करण्यात आली आहे. २६/११ च्या घटनेत राणाचा हात असल्याचा संशय होता. मात्र त्याची या आरोपातून मुक्तता करण्यात आली. पण डेन्मार्क  येथील एका वृत्तपत्रकार्यालयावरील हल्ल्याप्रकरणी तो दोषी आढळला आहे.

[EPSB]

हेडली,राणा यांना जानेवारीत शिक्षा

मुंबई दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्याप्रकरणी लष्कर ए तैयब्बाचा दहशतवादी डेव्हिड हेडलीला १७ जानेवारी तर राणाला १५ जानेवारीला शिक्षा सुनावली जाणार आहे.

 

 

हेडलीची शिक्षा

मूळचा पाकिस्तानी परंतु अमेरिकेत शिकागो येथे स्थायिक झालेला दाऊद सय्यद जिलानी ऊर्फ डेव्हिड कोलमन हेडली याच्यावर दहशतवादी कारवायात सहभाग असल्याचा अमेरिकेत सुरू असलेला खटला संपला असून, त्याला १५ जानेवारी रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे.

२६/११ला भारतीय गुप्तचर संस्थाच जबाबदार

२६/११च्या दहशतवादी हल्ल्याला भारतीय गुप्तचर संस्थांचे अपयशच कारणीभूत होते, इतकेच नव्हे तर त्यामध्ये काही भारतातीलच काही घटकांचाही समावेश होता अशी मुक्ताफळे भारत दौ-यावर असलेल्या पाकिस्तानचे गृहमंत्री रहमान मलिक यांनी रविवारी उधळली.

 

 [/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version