Home टॉप स्टोरी हेडलीला‘तात्पुरतं’भारताच्या स्वाधीन करा

हेडलीला‘तात्पुरतं’भारताच्या स्वाधीन करा

0

मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी डेव्हिड हेडलीला वर्षभरासाठी भारताच्या ताब्यात द्यावे, अशी विनंती अमेरिकन सरकारला केली आहे.
नवी दिल्ली – मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी डेव्हिड कोलमन हेडलीला वर्षभरासाठी भारताच्या ताब्यात देण्यात द्यावे. त्याशिवाय तहुव्वीर राणाचे प्रत्यार्पण करण्यात यावे जेणेकरुन मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी अधिक नवे खुलासे हाती लागतील, अशी विनंती भारताने अमेरिकन सरकारला केली आहे.

भारत अमेरिका यांच्यात २० ते २२ मे दरम्यान झालेल्या सुरक्षा परिषदेमध्ये हेडलीला वर्षभरासाठी भारताच्या स्वाधीन करावे अशी विनंती सरकारने अमेरिकेला केली आहे. मात्र अमेरिकेने हेडलीच्या प्रत्यार्पणासंदर्भात अक्षमता दाखवली.

लष्कर ए तैयब्बाचा दहशतवादी हेडलीचा मित्र राणा याच्या प्रत्यार्पणासंदर्भात मात्र अमेरिकेने भारताला आश्वासन दिल आहे. राणाने मुंबईत २६/११ ला झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा कट आखण्यात मदत केली होती.

भारताच्या या विनंतीवर अमेरिकन सरकारने दुस-यांदा हेडलीच्या चौकशीची मागणी मान्य केली आहे.मात्र डेन्मार्क वृत्तपत्राच्या कार्यालयावरील हल्ल्याप्रकरणी अमेरिकेच्या ताब्यात असलेल्या राणाशी आतापर्यंत कोणत्याही प्रकारच्या चौकशीची परवानगी भारताला देण्यात आलेली नाही. त्यामुळे राणाच्या चौकशीची विनंती मान्य झाल्यास २६/११ च्या हल्ल्यासंदर्भातील अनेक महत्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version