Home महामुंबई हिट अँड रनप्रकरणी सलमान अडचणीत येणार

हिट अँड रनप्रकरणी सलमान अडचणीत येणार

0

मुंबईत २००२ साली झालेल्या ‘हिट अँड रन’ प्रकरणी अभिनेता सलमान खानच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

मुंबई- भरधाव गाडी चालवून निष्पापांचे बळी घेणारा अभिनेता सलमान खान दुर्घटनेच्या रात्री जुहू येथील हॉटेलच्या पार्किंगमध्ये ‘चालकाच्या जागे’वर बसला होता, असे हिट अँड रन प्रकरणातील साक्षीदाराने गुरुवारी सत्र न्यायालयात सांगितले. या साक्षीमुळे सलमान अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

‘हिट अँड रन’प्रकरणाची सुनावणी सत्र न्यायालयात पुन्हा सुरू झाली. साक्षीदारांच्या उलटतपासणीत एका साक्षीदाराने सलमान खान ‘चालकाच्या जागे’वर बसल्याचे न्यायालयाला सांगितले. मात्र, खानला ‘ड्रायव्हर सीट’वर पाहिले नसल्याचे हॉटेलच्या पार्किंगमधील कर्मचारी कल्पेश वर्माने न्यायालयाला सांगितले. तसेच गाडी चालवणा-या व्यक्तीचीदेखील ओळख शर्माला न्यायालयात सांगता आली नाही. हॉटेलमध्ये प्रवेश केल्यानंतर सलमान खानने पार्किंगची पावती आणि पाचशे रुपयांची ‘टिप’ दिल्याचे साक्षीदाराने सरकारी वकिलांना सांगितले. उलटतपासणीत पार्किंगच्या पावतीवर सलमान खानचे नाव नसल्याचे सलमानच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले.

तसेच गाडीमध्ये अभिनेता कमाल खानही उपस्थित असल्याचे साक्षीदाराने सांगितले परंतु गाडीत बसण्याचे त्याचे अचूक स्थान स्पष्ट करण्यास साक्षीदाराने असमर्थता व्यक्त केली. घटनेच्या वेळी जमावाचा सलमानला बाहेर बोलवण्यासाठी असलेला आवाज ऐकल्याचे दुस-या साक्षीदाराने न्यायालयात सांगितले.

मात्र, सलमान खान न दिसता त्याच्या सुरक्षारक्षकास मारहाण होत असताना पाहिल्याचे त्याने स्पष्ट केले. दरम्यान, सलमान खान गुरुवारच्या सुनावणीदरम्यान न्यायालयात हजर झाला होता.

येत्या ५ नोव्हेंबर रोजी या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version