Home Uncategorized हायब्रिड बसचे कंत्राट टाटा मोटर्सला

हायब्रिड बसचे कंत्राट टाटा मोटर्सला

0
संग्रहित छायाचित्र

एमएमआरडीएकडून टाटा मोटर्सला २५ हायब्रिड इलेक्ट्रिक बस पुरवण्याचे कंत्राट मिळाले आहे. टाटा मोटर्सने याबाबत पत्रक काढून माहिती दिली आहे.

संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली – एमएमआरडीएकडून टाटा मोटर्सला २५ हायब्रिड इलेक्ट्रिक बस पुरवण्याचे कंत्राट मिळाले आहे. टाटा मोटर्सने याबाबत पत्रक काढून माहिती दिली आहे. टाटा स्टारबस डिझेल हायब्रिड इलेक्ट्रिक बससाठी दिलेले हे कंत्राट हायब्रिड इलेक्ट्रिक तंत्रज्ञानासाठी देण्यात आलेले सर्वात मोठे कंत्राट आहे, असे या पत्रकात सांगितले आहे.

मात्र या कंत्राटाची रक्कम कंपनीने उघड केलेली नाही. या बसमुळे एमएमआरडीए सर्वात जलद गतीने वाढणा-या बीकेसी संकुलाला थेट शीव, वांद्रे आणि कुर्ला रेल्वेस्थानकांशी पुढील एका वर्षात जोडू शकेल.

टाटा मोटर्सचे कार्यकारी संचालक रवी पिशारोडी म्हणाले की, संपूर्ण एतद्देशीय बनावटीच्या या बसमुळे आम्ही परवडणा-या आणि शाश्वत परिवहनासाठी एमएमआरडीएच्या दृष्टिकोनात भागीदार बनलो आहोत, याचा आम्हाला अत्यानंद झाला आहे.

भविष्यात विद्युत ऊर्जेचा परिवहनासाठी वापर हाच तोडगा असून आम्ही या तंत्रज्ञानाच्या संभाव्य क्षमतासाठी पूर्ण सज्ज आहोत. कंपनीने असेही म्हटले आहे की, आमची इलेक्ट्रिक बस सर्वात स्वस्त असून इंधनाची बचत २५ ते ३० टक्के होते. तसेच कार्बनचे उत्सर्जन नेहमीच्या बसपेक्षा कमी होऊन केवळ विद्युत ऊर्जेवर एकूण प्रवासाच्या अंतराच्या ३० ते ३५ टक्के अंतर कापते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version