Home देश हरिशंकर ब्रम्हा नवे मुख्य निवडणूक आयुक्त

हरिशंकर ब्रम्हा नवे मुख्य निवडणूक आयुक्त

0

निवडणूक आयुक्त हरिशंकर ब्रम्हा यांनी गुरुवारी मुख्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्त करण्यात आली.
नवी दिल्ली- निवडणूक आयुक्त हरिशंकर ब्रम्हा यांनी गुरुवारी मुख्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्त करण्यात आली. मुख्य निवडणूक आयुक्त व्ही.एस.संपत गुरुवारी निवृत्त झाले. त्याची जागा आता ब्रम्हा घेतील.

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सर्वात ज्येष्ठ असलेल्या ब्रम्हा यांची मुख्य निवडणूक आयुक्तपदी केली. ते उद्यापासून या पदाचा कारभार स्वीकारतील असे कायदा मंत्रालयाने म्हटले आहे.

ब्रम्हा यांची मुख्य निवडणूक आयुक्तपदी निवड झाल्यामुळे सरकारला आता तीन सदस्यीय निवडणूक आयोगाच्या समितीवर एका सदस्याची नियुक्ती करावी लागणार आहे. भारतीय निवडणूक आयोग हा तीन सदस्यांचा असतो. त्यात एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि अन्य दोन आयुक्तांचा समावेश असतो.

मुळचे आसामचे असलेले ब्रम्हा हे १९७५च्या आंध्र प्रदेश कॅडरचे अधिकार आहेत. मुळात त्यांना केवळ तीन महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. संविधानानुसार मुख्य निवडणूक आयुक्तपदावर केवळ वयाच्या ६५वर्षापर्यंत काम करता येते. ब्रम्हा १९ एप्रिल रोजी या पदावरून निवृत्त होतील.

ब्रम्हा यांनी केंद्रात ऊर्जा सचिव म्हणून काम केले होते. त्यानंतर २५ ऑगस्ट २०१०पासून निवडणूक आयुक्त म्हणून काम सुरु केले.  ईशान्य भारतातील जे.एम.लिंगडोह यांच्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्तपदावर पोहचलेले ब्रम्हा हे पहिलेच आयुक्त ठरले आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version