Home महाराष्ट्र स्थगनच्या निकषात न बसणा-या विषयासाठी पर्यायी आयुध हवे

स्थगनच्या निकषात न बसणा-या विषयासाठी पर्यायी आयुध हवे

0

स्थगन प्रस्ताव हा विधिमंडळाच्या सदस्यांसाठी प्रभावी आयुध आहे. स्थगन म्हणजे सरकारविरोधातील एखाद्या विषयाचा अविश्वास ठरावच असतो. 

नागपूर – स्थगन प्रस्ताव हा विधिमंडळाच्या सदस्यांसाठी प्रभावी आयुध आहे. स्थगन म्हणजे सरकारविरोधातील एखाद्या विषयाचा अविश्वास ठरावच असतो. मात्र या आयुधाला शोभेल अथवा त्या दर्जाचे विषयच स्थगनात विरोधकांमार्फत मांडले जात नसल्याबद्दल विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी नाराजी व्यक्त केली.

त्यामुळे असे विषय मांडण्यासाठी वेगळय़ा नियमांची निर्मिती करण्याची गरज निर्माण झाल्याचे ते म्हणाले.विरोधी पक्षाकडून जे स्थगन प्रस्तावर दाखल केले जातात ते निकषात बसत नसल्याने वेळोवेळी फेटाळले जातात. यामुळे सभागृहाचा वेळही वाया जातो. यामुळे स्थगनसारख्या आयुधाचेच अवमूल्यन होत आहे. त्याची उंचीच जणू कमी होत आहे.

स्थगनबाबतचा असलेला वचक यामुळे कमी होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे कोणतेही विषय स्थगनसाठी मांडू नयेत, अशी सूचना वळसे- पाटील यांनी केली. अशा विषयांसाठी वेगळा नियम करण्याची गरज आहे. त्यासाठी नियम समितीची बैठक बोलावली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. विषयांचे गांभीर्य सदस्यांना असले पाहिजे, असेही ते म्हणाले.

यापुढे स्थगन प्रस्ताव दाखल करण्यापूर्वी त्या पक्षाच्या गटनेत्यांनी त्याची तपासणी करावी व तो निकषात बसणारा असला तरच आपल्याकडे पाठवावे, असेही पाटील यांनी सभागृहाला सांगितले.

रवींद्र वायकर यांचे अज्ञान
स्थगन प्रस्ताव कोणत्या विषयांवर असावा, याबाबत शिवसेनेचे आमदार रवींद्र वायकर यांचे अज्ञान विधानसभेत दिसून आहे. एका लिफ्टमध्ये एकाच वेळी अनेक लोक अडकल्याचा स्थगन प्रस्ताव त्यांनी दिला होता. याबाबत नाराजी व्यक्त करत हा विषय तर कोणत्याच नियमात बसत नाही, असे सांगत विधानसभा अध्यक्षांनी वायकर यांची खिल्ली उडवली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version