Home टॉप स्टोरी अखेर गिरीराज सिंह यांनी मागितली माफी

अखेर गिरीराज सिंह यांनी मागितली माफी

0

मोदी सरकारमधील मंत्री गिरीराज सिंह यांनी कॉँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या विरोधात केलेल्या वर्णद्वेषी विधानाबाबत काँग्रेसच्या खासदारांनी सोमवारी रुद्रावतार धारण केला.


नवी दिल्ली- मोदी सरकारमधील मंत्री गिरीराज सिंह यांनी कॉँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या विरोधात केलेल्या वर्णद्वेषी विधानाबाबत काँग्रेसच्या खासदारांनी सोमवारी रुद्रावतार धारण केला. ‘गिरीराज यांनी राजीनामा’ द्यावा, अशी जोरदार मागणी काँग्रेसने केली. अखेर गिरीराज सिंह यांनी संसदेत आपला माफीनामा सादर केला.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुस-या सत्राला सोमवारपासून सुरुवात झाली. लोकसभेचे कामकाज सुरू होताच काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी गिरीराज यांच्या वर्णद्वेषी वक्तव्याचा मुद्दा उचलून धरला. यावेळी काँग्रेस खासदारांनी जोरदार घोषणाबाजीही केली.

गिरीराज सिंह हे मंत्री असल्याने या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली पाहिजे. तसेच सिंह यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करायला हवे, अशी मागणी काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खग्रे यांनी केली. भाजपाचे अनेक खासदार व मंत्री हे सातत्याने वादग्रस्त विधाने करत आहेत. त्यामुळे समाजात फूट पडते, असा आरोप खर्गे यांनी केला.

काँग्रेसच्या गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज पावणेबारा वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले होते. कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सिंह यांना उत्तर देण्यास सांगितले. सिंह म्हणाले की, माझा कुणालाही दुखवण्याचा हेतू नव्हता. मात्र, माझ्या वक्तव्यातून कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास मी माफी मागतो.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version