Home Uncategorized सेन्सेक्समध्ये २९ अंकांची घसरण

सेन्सेक्समध्ये २९ अंकांची घसरण

0

रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरणाच्या पार्श्वभूमीवर व्याजदराशी संबंधित बँका आणि वाहन क्षेत्राच्या शेअरमध्ये विक्री झाल्याने सोमवारी मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये २९ अंकांची घट होऊन हा निर्देशांक २६,५९७.११वर बंद झाला.
मुंबई- रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरणाच्या पार्श्वभूमीवर व्याजदराशी संबंधित बँका आणि वाहन क्षेत्राच्या शेअरमध्ये विक्री झाल्याने सोमवारी मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये २९ अंकांची घट होऊन हा निर्देशांक २६,५९७.११वर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये ९.९५ अंकांच्ह घट होऊन तो ७९५८.९०वर बंद झाला. अमेरिकेच्या चांगल्या आर्थिक आकडेवारीने रुपया डॉलरसमोर ३८ पैशांनी कमजोर पडून ६१.५३ या सात महिन्यांच्या नीचांकी पातळीवर घसरला.

अमेरिकेच्या जीडीपीची आशादायी आकडेवारी बाजारात सकारात्मक वातावरण घेऊन आली. मात्र मंगळवारी जाहीर होणा-या पतधोरणाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी खरेदीपासून दूर राहणे पसंत केल्याचे बोनांझा पोर्टफोलिओच्या वरिष्ठ विश्लेषक निधी सारस्वत यांनी सांगितले.

डॉलरच्या तुलनेत कमजोर पडलेल्या रुपयाचा माहिती-तंत्रज्ञान शेअरना मोठा फायदा झाला. टीसीएस, इन्फोसिस, आणि विप्रो या आघाडीच्या कंपन्यांनी १ ते ३ टक्क्यांपर्यंत वाढ राखली. तर आयटीसी, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, एचडीएफसी, ओएनजीसी, सेसा स्टरलाइट, टाटा स्टील, बजाज ऑटो, हिरो मोटोकॉर्प आणि कोल इंडिया यांच्यावर विक्रीचा दबाव राहिला.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version