Home Uncategorized सेन्सेक्सने घेतली ४६४ अंकांची उसळी

सेन्सेक्सने घेतली ४६४ अंकांची उसळी

0

आशियाई बाजारात तेलाच्या किमतीत किंचित झालेली वाढ आणि रिझर्व्ह बँकेने बँकांसाठी भांडवली गरजांच्या नियमांत शिथिलता आणल्यामुळे मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने बुधवारी ४६४ अंकांनी उसळी घेतली.

मुंबई- आशियाई बाजारात तेलाच्या किमतीत किंचित झालेली वाढ आणि रिझर्व्ह बँकेने बँकांसाठी भांडवली गरजांच्या नियमांत शिथिलता आणल्यामुळे मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने बुधवारी ४६४ अंकांनी उसळी घेतली.

सलग दुस-या दिवशी बाजारात वाढ झाली असून एका महिन्यातील हा उच्चांक आहे. निर्देशांकाने मंगळवारी ७७७ अंकांनी उसळी घेतली होती.

निर्देशांक २४,२४३ वर बंद झाला तर निफ्टीतही १४६.५५ अंकांनी वाढ होऊन ७,३६८.८५ वर बंद झाला.

एसबीआय, पीएनबी, बँक ऑफ बडोदा या बँकांचे समभाग वधारले. त्याखालोखाल आयसीआयसीआय बँकेचा क्रमांक लागला. तर अदानीपोर्ट्स, हिरो मोटरकॉर्प, भेल, टाटा स्टील, अ‍ॅक्सिस बँक, एनटीपीसी, एचडीएफसी आणि मारुती सुझुकी यांच्या लाभाने सेन्सेक्सच्या उसळीला हातभार लागला.

मात्र महिंद्रा अँड महिंद्रा, कोल इंडिया, सन फार्मा या कंपन्यांचे शेअर्सचे मोठे नुकसान झाले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version