Home व्यक्तिविशेष सेतू माधवराव पगडी

सेतू माधवराव पगडी

0

प्रसिद्ध इतिहास संशोधक सेतू माधवराव पगडी यांचा आज जन्मदिन. दि. २७ ऑगस्ट १९१० रोजी मराठवाडय़ातील निलंगा येथे जन्मलेल्या श्री. पगडींचे पारसी, ऊर्दू भाषांवर प्रभुत्व होते. बनारसच्या हिंदू युनिव्हर्सिटीतून बी. ए. ला त्यांनी सुवर्णपदक मिळवले होते. आय. ए. एस. असलेल्या पगडींनी शासनात अनेक महत्त्वपूर्ण पदे भूषवली. जिल्हाधिकारी, शिक्षण व गृहखात्याचे उपसचिव, महाराष्ट्र जिल्हा गझ्रेटियर्सचे संपादक अशा अनेक पदांवर त्यांनी काम केले. मराठय़ांच्या इतिहासावर त्यांचा अधिकार निर्विवादपणे मानला जात असे. त्यांच्यामुळेच अनेक ऊर्दू, पारसी कागद मराठीत आले. औरंगजेबचा इतिहासकार खाफीखान यांच्या ग्रंथाचा ‘मराठय़ांचे स्वातंत्र्ययुद्ध’ असा अनुवाद, मासिरे आलमगिरीचे ‘मराठे व औरंगजेब’ असे रूपांतर, ‘महाराष्ट्र आणि मराठे’, ‘शिवछत्रपतींची प्रभावळ’, ‘शिवरायांचे इंग्रजी चरित्र’ असे ग्रंथ लिहिणा-या पगडींनी सुफी संप्रदायाची परंपरा आणि तत्त्वज्ञान यांचाही मराठी रसिकांनी परिचय करून दिला. ‘विडा रंगतो असा’, ‘मणिकांचन’ हे लेखसंग्रह ही त्यांची अन्य ग्रंथसंपदा.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version