Home महाराष्ट्र सुरेश कलमाडींचे सक्रिय राजकारणात सहभागाचे संकेत

सुरेश कलमाडींचे सक्रिय राजकारणात सहभागाचे संकेत

0

पुणे – पुण्यातील मानाचा पहिला गणपती असणा-या श्रीकसबा गणपती मंडळाच्या मिरवणुकीत सुरेश कलमाडींचा सहभाग चर्चेचा विषय ठरला. श्रीकसबा गणपती मंडळाच्या मिरवणुकीने या सोहळ्याची सुरुवात झाली. या वेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक आणि काँग्रेसचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांनी गणपतीला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर या सर्व राजकारण्यांनी एकत्र बसून नाश्ताही केला. सुरेश कलमाडी यांनी अनेक वर्षांनंतर सार्वजनिक कार्यक्रमात घेतलेला सहभाग अनेकांचे लक्ष वेधून घेत होते. त्यामुळे कलमाडी पुण्याच्या राजकारणात पुन्हा सक्रिय होणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

कॉमनवेल्थ घोटाळा उघडकीस आल्यानंतर खासदार सुरेश कलमाडी यांना काँग्रेस पक्षातून निलंबित व्हावे लागले होते. त्यानंतर गेल्या चार वर्षांमध्ये सुरेश कलमाडी यांनी पुण्यातील सार्वजनिक कार्यक्रमांना फारशी हजेरी लावली नव्हती. कलमाडींच्या निलंबनानंतर लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत काँग्रेसला सपाटून मार खावा लागला होता. त्यानंतर पुण्यातील काँग्रेसच्या राजकारणाची सूत्रे पुन्हा कलमाडी यांच्याकडे सोपविण्यात येतील, अशी चचार्ही रंगली होती. परंतु, काही दिवसांपूर्वीच कलमाडी यांनी पुणे महापालिकेतील भाजपच्या कारभारावर समाधान व्यक्त केल्याने नव्या राजकीय चर्चांना उधाण आले.

त्यानंतर आज त्यांनी थेट भाजप नेत्यांबरोबर गणपती विसर्जन मिरवणुकीला हजेरी लावली. त्यामुळे सुरेश कलमाडी यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेनेपुन्हा जोर धरला आहे. श्रीकसबा गणपती मंडळाच्या मिरवणूक सोहळ्याला महापौर मुक्ता टिळक, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे तसेच सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी उपस्थित होते. ही राजकीय मंडळी नाश्त्यासाठी एकत्र जमली. या वेळी कलमाडी आणि बापट एकाच टेबलावर बसले होते. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version