Home महामुंबई ठाणे सुरक्षा रक्षकांच्या वेतनात महापौरांनी केला भ्रष्टाचार

सुरक्षा रक्षकांच्या वेतनात महापौरांनी केला भ्रष्टाचार

0

शिक्षण मंडळातील सुरक्षा रक्षकांच्या वेतनात महापौरांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप  विरोधकांनी करत या प्रकरणी प्रशासन कोणाला पाठीशी घालत आहे, असा सवालही केला आहे.

ठाणे- शिक्षण मंडळातील सुरक्षा रक्षकांच्या वेतनात महापौरांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप  विरोधकांनी करत या प्रकरणी प्रशासन कोणाला पाठीशी घालत आहे, असा सवालही केला आहे.

सोमवारच्या सर्वसाधारण सभेत काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी सुरक्षा रक्षकांच्या वेतनातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची फाईल तीन महिन्यांपासून अतिरिक्त आयुक्तांच्या कार्यालयात पडून आहे. यात एका वरिष्ठ पदाधिका-याला वाचवण्याचा प्रयत्न प्रशासन करत आहेत. असा आरोप केला.

तेव्हा विरोधकांनी या प्रकरणात शिक्षण मंडळाचे तत्कालीन सभापती व विद्यमान महापौर संजय मोरे यांचा सहभाग असून त्यांनाच वाचवण्यासाठी प्रशासन धडपड करत असल्याचे सांगत सभागृहात गदारोळ घालण्याचा प्रयत्न केला. ठाणे महापालिकेतील शाळांचा विषय सुरू असतानाच हा विषय चर्चेला आला.

त्यावेळी विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे यांनी महापालिकेच्या शिक्षण विभागात शिक्षणाधिकारी नाही. त्यामुळे अनेक कामे वेगाने होत नसल्याचे सांगितले. त्यानंतर आयुक्तांनी या प्रकरणी निवेदन करण्याची मागणी केली. या प्रकरणाची माहिती घेतल्यानंतर कळवू, असे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सांगितले.

महापालिकेच्या शिक्षण विभागाला शिक्षणाधिका-याची गरज आहे, त्यासाठीचा पाठपुरावा सुरू आहे, असेही आयुक्तांनी सांगितले. दरम्यान संजय मोरे हे ठाणे महापालिका शिक्षण मंडळाचे सभापती असताना हा प्रकार घडला होता.

सभागृहात करण्यात आलेले आरोप बिनबुडाचे आहेत. या प्रकरणाची चौकशी लाचलुचपत विभागाने केली होती. त्यात माझ्यावर कोणताही आरोप नसल्याचे सिद्ध झाले होते, असे महापौर संजय मोरे यांनी दै.‘प्रहार’शी बोलताना सांगितले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version