Home देश सुमित्रा महाजन होणार लोकसभेच्या नव्या सभापती

सुमित्रा महाजन होणार लोकसभेच्या नव्या सभापती

0

सोळाव्या लोकसभेच्या सभापती म्हणून भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि लोकसभेच्या वरिष्ठ सदस्य सुमित्रा महाजन यांची निवड करण्यात येणार आहे.

नवी दिल्ली- सोळाव्या लोकसभेच्या सभापती म्हणून भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि लोकसभेच्या वरिष्ठ सदस्य सुमित्रा महाजन यांची निवड करण्यात येणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गृहमंत्री राजनाथ सिंह हे महाजन यांच्या नावाची लवकरच घोषणा करणार असल्याचे समजते. सभापती निवडीसाठी शुक्रवारी निवडणूक होणार आहे. यावेळी पक्ष सुमित्रा महाजन यांच्या नावाची अधिकृत घोषणा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

महाजन जर सभापती म्हणून निवडून आल्या तर मीरा कुमार यांच्यानंतरच्या त्या दुस-या महिला सभापती असतील. १९८९ पासून महाजन यांचा एकदाही निवडणूकीत पराभव झालेला नाही. यंदा त्यांनी इंदौरमधून आठव्यांदा निवडणूक जिंकली. या निवडणूकीत त्यांनी ४.६७ लाख मताधिक्यांनी विजय मिळवला. १९९९ ते २००४ या अटलबिहारी वाजपेयींच्या सरकारमध्ये त्यांनी राज्यमंत्रीपद भूषवले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version