Home मनोरंजन ‘सिंग इज ब्लिंग’ हा अॅक्शन,कॉमेडी आणि रोमान्सचा मिलाफ

‘सिंग इज ब्लिंग’ हा अॅक्शन,कॉमेडी आणि रोमान्सचा मिलाफ

0

बॉलीवूडचा अॅक्शन हिरो अशी ओळख असलेला अक्षय कुमार आपल्या आगामी ‘सिंग इज ब्लिंग’ या सिनेमाबाबत खूपच उत्सुक आहे.

मुंबई – बॉलीवूडचा अॅक्शन हिरो अशी ओळख असलेला अक्षय कुमार आपल्या आगामी ‘सिंग इज ब्लिंग’ या सिनेमाबाबत खूपच उत्सुक आहे.  या चित्रपटाच्या शूटिंगसाठी आपण खूपच उत्सुक असल्याचे त्याने ट्विटरवरुन आपल्या चाहत्यांना सांगितले.

नुकताच अक्षय कुमारचा ‘बेबी’ हा सिनेमा प्रदर्शित झालाय. या चित्रपटास प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसादही मिळत आहे. अक्षयचा आगामी ‘सिंग इज ब्लिंग’ हा सिनेमा दोन ऑक्टोबर महात्मा गांधींच्या जयंतीदिवशी प्रदर्शित होणार आहे.

‘सिंग इज ब्लिंग’ चित्रपटाची तयारी जोरात सुरु आहे. हा सिनेमा म्हणजे अॅक्शन,कॉमेडी आणि रोमान्सचे एकत्रित मिलाफ आहे. शूटिंगसाठी आता आणखी वाट पाहू शकत नाही. दोन ऑक्टोबरला आम्ही येतोय, असे अक्षयने ट्विट केले आहे.

‘सिंग इज ब्लिंग’ या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभुदेवा करत आहेत. तर अक्षयसोबत या चित्रपटात करीना कपूर आणि कृती सॅनोन ही स्टारकास्ट असणार आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version