Home महामुंबई ठाणे साळोख गावातील तापाची साथ आटोक्यात

साळोख गावातील तापाची साथ आटोक्यात

0

कर्जत तालुक्यातील साळोख गावात डासांच्या प्रादुर्भावामुळे तापाची साथ पसरलेली…
नेरळ- कर्जत तालुक्यातील साळोख गावात डासांच्या प्रादुर्भावामुळे तापाची साथ पसरलेली होती. मात्र, आठवडयाभराच्या प्रयत्नानंतर तापाची साथ आटोक्यात आणण्यात आरोग्य खात्याला यश आले आहे. आता गावात तापाचे केवळ दोनच रुग्ण आहेत, असे कळंब प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शाम पावरा यांनी स्पष्ट केले आहे.

कळंब आरोग्य केंद्र परिसरातील बोरगाव उपकेंद्रात साळोख गावाचा समावेश होतो. काही दिवसांपूर्वी गावात तापाची साथ पसरलेली होती. तसेच येथे हिवतापाचे दोन रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे डॉ. पावरा यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांची टीम तयार करून गावातील ५४ रुग्णांची तपासणी केली होती. तसेच घरोघरी जाऊन पाण्याची भांडी कोरडी करावी, डासांची उत्पत्ती होणार नाही, याबाबत काळजी घ्यावी, यासाठी जनजागृती करण्यात आली होती. त्यानंतर आठवडयाभरातच तापाची साथ आटोक्यात आल्याचे पावरा यांनी सांगितले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version